मुख्यमंत्र्यांची आज टास्कफोर्ससोबत बैठक; निर्बंध आणखी शिथिल होणार?

 


मुंबई l  राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. कारण, दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत आता मोठ्याप्रमाणावर घट झाली आहे. शिवाय, करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. करोनाबाधित रूग्णांची दररोजच्या मृत्यू संख्या देखील घटली आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोविड टास्क फोर्स सोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. निर्बंध शिथील होण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. दिवाळीआधी आणखी काही निर्बंध शिथील होऊ शकतात. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच राज्यात करोना निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिलेत.

राज्यात आता शाळा, सार्वजनिक वाहतुकीसह बऱ्याच गोष्टी सुरु झाल्या आहेत. पण वेळेच्या बाबतीत अजूनही काही मर्याद आहेत. हॉटेल, दुकानांना वेळेची मर्यादा पाळावी लागत आहे. सध्यस्थितीत व्यापारी दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्स यांना रात्री १० वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी आहे. हॉटेल्समध्येही ५० टक्के ग्राहकांनाच मुभा आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post