सहा वाहनांचा विचित्र अपघात; तीन ठार, ६ जखमी



 मुंबई l मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर झालेल्या भीषण अपघातात (Mumbai - Pune Expressway Accident) तीन जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजणेच्या सुमारास बोर घाटात (Bhor Ghat) झाला.

या अपघातात दोन टेम्पो, कार, खाजगी बस आणि ट्रेलरचा समावेश आहे. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्याहून (Pune) मुंबईकडे (Mumbai) येणाऱ्या भरधाव येणाऱ्या कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पोने पुढे जाणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली.

यामुळे झालेल्या अपघातात टेम्पोने स्विफ्ट कारला धडक दिली, तर दुसऱ्या टेम्पोने कॉईल वाहून नेणाऱ्या ट्रकला धडक दिली. त्याच वेळी एका ट्रकने खाजगी बसला पाठीमागून धडक दिली. (Mumbai-Pune Expressway Accident)

अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळित झालेली वाहतूक आता सुरळीत आहे. घटनास्थळी महामार्ग पोलिसांचे (Highway Police) एक पथक पोहचले असून बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अपघातात (Accident) ट्रक चालकाचा दोष समोर येत असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post