गडचिरोलीत 26 नक्षलींना कंठस्नान



 गडचिरोली । गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli district) धानोरा तालुक्यात (dhanora taluka) आज पोलीस (police) आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxalites) जोरदार चकमक उडाली आहे. मरभीनटोला गावानजीक कोटगुलच्या जंगलात झालेल्या या चकमकीत 26 नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान (Encounter) घातलें. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल (Superintendent of Police Ankit Goyal) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटगुल जंगल परिसरात आज शनिवारी सकाळी पोलिसांचे सी-60 पथक शोध अभियान राबवत होते. यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक सी-60 पथकावर गोळीबार (Firing) सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत गोळीबार केला.

पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात 26 नक्षलवाद्यांचा खात्मा (Extermination of Naxals) करण्यात आला. पोलिसांनी जिल्ह्यात नक्षलवाद्यांचें कंबरडें मोडण्यास सुरुवात केली आहे. कोटगुलच्या जंगलात फोनचे नेटवर्क नसल्याने जवानांशी संपर्क होत नव्हता.

त्यामुळे नक्की किती नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलें, याबाबतची माहिती मिळत नव्हती. मात्र आता गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारी या परिसरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असेंही पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलें आहे.

मिलिंद तेलतुंबडे ठार?

या नक्षलवाद विरोधी कारवाईमध्ये नक्षलवाद्यांचा महाराष्ट्र सचिव सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्यावर 50 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. ठार झालेले नक्षलवादी नेमके कोण आहेत त्यांची ओळख पटविण्यासाठी सर्व मृतदेह जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहेत. यातील एक मृतदेह सह्याद्रीचा असू शकतो. यांची ओळख पटविण्यासाठी तज्ञ पोलिसांसह आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींपैकी काही जणांना सुद्धा पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post