श्रीगोंदा | श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ गावातील भर वस्तीमध्ये असणारे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम तीन ते चार चोरट्यांनी फोडले.
ते मशीन घेऊन जात असताना गस्तीवर असणंऱ्या पोलीस वाहनाचा सायरन वाजल्याने चोरट्यांनी एटीएम मशीन रस्त्यातच टाकून पोबारा केला. या मशीनमध्ये अंदाजे पंचवीस लाख रुपयापेक्षा अधिक रोकड असल्याची माहिती मिळाली. याबाबत विश्वास पोपट कसबे यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान श्रीगोंदा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका संशियतास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एका आरोपीला संशयावरून ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावर पोलिस उपअधीक्षक आण्णा जाधव, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी भेट दिली,.
Post a Comment