भरधाव बीएमडब्लूचा दुभाजकाला धडकून भीषण अपघात



 पुणे | म्हात्रे पुलाजवळील डी. पी. रस्त्यावर रात्रीच्या सुमारास भरधाव बी. एम. डब्लू या गाडीचा दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. (Pune BMW Accident)

एक बीएमडब्लू भरधाव वेगाने डीपी रोडकडे जात होती. गाडी म्हात्रे पुल परिसरात येताच दुभाजकाला धडकून हा अपघात झाला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हा अपघात मध्यरात्री २.३० ते ३.३० च्या दरम्यान झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

अपघात झाला त्यावेळी गाडीत दोन तरुण होते. या दोन्ही तरुणांचे पाय लेग रुममध्ये अडकले होते. अग्निशमन दलाच्या मदतीने या दोन्ही तरुणांना गाडीतून बाहेर काढण्यात आले व त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की गाडीच्या समोरच्या भागाचे पूर्णपणे नुकसान झालं आहे. गाडी दुभाजकाला धडकल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post