अहमदनगर | ‘ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ स्थापना होऊन साठ वर्षे उलटून गेली आहेत, मात्र या महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याचा मुद्दा कधीच उपस्थित झाला नाही. आता कर्मचाऱ्यांना भडकावण्यासाठी भाजपकडून तो पुढे केला गेला आहे. इकडे एसटीसाठी हा मुद्दा लावून धरणाऱ्या राज्यातील भाजपच्या नेत्यांना केंद्र सरकारने ' एअर इंडिया 'चे खासगीकरण केलेले कसे चालते,’ असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत तालुक्यामध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment