शिर्डी | करोना महामारीमुळे बंद केलेले जगप्रसिद्ध साईमंदिराचे दरवाजे घटस्थापनेला दर्शनासाठी भाविकांसाठी खुले करून आज एक महिना उलटून गेला असून दिपावलीच्या सलग सुट्ट्यामुळे शिर्डीत शनिवार व रविवारी भाविकांची अलोट गर्दी झाली आणी सर्व्हर डाऊन झाल्याने आँनलाईन दर्शनपाससेचा पूरता फज्जा उडाला, त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी खाजगी ठिकाणी जाऊन पासेस घेण्यासाठी कसरत करावी लागली मात्र दर्शनपासेस उपलब्ध न झाल्याने कळसाचे दर्शन घेऊनच माघारी परतावे लागले असून संस्थान साईसंस्थान प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत भक्तांनी तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान घटस्थापनेला साईमंदिर खुले केल्यानंतर साईसंस्थानच्या मुख्य उत्सवापैकी एक असलेल्या दिपावली उत्सवाला गुरुवार नंतर सलग सुट्या असल्याने शुक्रवार, शनिवार, रविवारी राज्यातील तसेच परराज्यातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. साईमंदिरात प्रशासनाच्या वतीने भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी नियोजनबद्ध कामकाज सुरू आहे. साईमंदीर सुरू झाल्यानंतर महिनाभरात साधारणपणे सुमारे अडीच ते तिन लाखाहून जास्त भाविकांनी साईदर्शनाचा लाभ घेतला तर पाच लाखापेक्षा जास्त भाविकांनी शिर्डीत साईदरबारी हजेरी लावली आहे.
साईसंस्थानच्या डेटा बेसचे काम टिसीएस कंपणीकडे देण्यात आले आहे. सदरचे काम सिएसआरच्या माध्यमातून फंड न देता मनुष्यबळ दिले आहे. असे असले तरी सर्व्हरसाठी लागणारे १२ ते १३ लाख रुपये भाडे संस्थान अदा करत आहे. दिपावलीत सदरचे कंपणीतील कर्मचारी सुट्टीवर असल्याचे समजले आहे. दरम्यान संस्थानच्या आयटी विभागातील सर्व्हर अचानकपणे डाऊन झाले, त्यामुळे आँनलाईन दर्शनपाससाठी अनेक अडचणी निर्माण झाल्याने अखेर भाविकांना कळसाचे दर्शन घेऊन माघारी परतावे लागले आहे.
संस्थानच्या आँनलाईन संकेतस्थळाचे अँप्लीकेशन, डेटाबेस सर्व्हर स्केल नाही झाले. ते संभाव्य गर्दीच्या हिशोबाप्रमाणे वाढले पाहिजे होते तसे न झाल्याने देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या साईबाबा संस्थानचा कारभार पारदर्शी व पथदर्शी चालावा यासाठी सनदी अधिकारी नेमण्यात यावा म्हणून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साईसमाधी शताब्दी वर्षापूर्वी आयएएस अधिका-यांची नियुक्ती केली आहे.
संस्थानवर सनदी अधिकारी येऊन आज चार ते पाच वर्षे होत आहे परंतु अजूनही साईभक्तांना सेवासुविधा पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. खरे तर आँनलाईन पासेस यंत्रणेत काही अपरिहार्य कारणास्तव त्रुटी निर्माण झाल्या तर अशावेळी तातडीने आँफलाईन दर्शन व्यवस्था सुरू करायला हवी. संस्थानच्या प्रभारीराज यंत्रणेमुळे देश विदेशातील भक्तांना सेवा देण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. आयटी विभागाचे खातेप्रमुखांनी याविषयी गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी यावेळी भाविकांनी केली असून भाविकांच्या दानावर चालणाऱ्या साईसंस्थानला भाविकांचा विसर पडला आहे का असा प्रश्न भाविकांमधून उपस्थित केला आहे.
Post a Comment