न्यूली वेड कतरिना कैफच्या 'टायगर 3' च्या शूटिंग वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. चित्रपटाशी संबंधित ट्रेड सूत्रांनी सांगितले की, कतरिना 15 डिसेंबरपासून चित्रीकरणात सहभागी झालेली नाही. आता ती नव्या वर्षातच पुन्हा शूटिंग सुरू करणार आहे. 23 डिसेंबरपर्यंत कतरिनाला वगळता इतर कलाकारांचे शूटिंग सुरु राहणार आहे. त्यानंतर नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सलमान खान कामातून थोडाकाळ ब्रेक घेणार आहे. अलीकडच्या काळात तो 'टायगर 3', 'अंतिम: द फायनल ट्रुथ' आणि 'द-बँग' टूरच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त होता.
अशा परिस्थितीत, त्याला त्याच्या वर्क कमिटमेंटमधून ब्रेक घ्यायचा आहे. परिणामी, त्याने 23 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान शूटमधून ब्रेक घेतला आहे. त्यानंतर तो पुन्हा 'टायगर-3'चे उर्वरित शेड्युल पूर्ण करणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 'टायगर 3' च्या शूटिंगसाठी दिल्ली किंवा लखनऊ यापैकी एक ठिकाण निश्चित केले जाणार आहे. सहा ते सात दिवस तिथे शूटिंग होणार आहे.
रिसेप्शननंतर इंदूरला जाणार आहे विकी
सूत्रांनी विकी-कतरिनाच्या रिसेप्शनशी संबंधित इनपुट देखील शेअर केले आहेत. त्यांनी सांगितले, '15 डिसेंबरपासून कतरिनाने 'टायगर 3'चे शूटिंग पुन्हा सुरू न करणे हे 20 डिसेंबरला तिच्या आनंदात इंडस्ट्रीलाही सामील करून घेण्याचे संकेत आहेत. त्यानंतर विकी कौशल 22 ते 23 डिसेंबर दरम्यान इंदूरमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी रवाना होणार आहे. तेथे त्याचे 30 ते 40 दिवसांचे वेळापत्रक असेल.'
खान कुटुंबीयांना निमंत्रण गेले नाही
दुसरीकडे मुंबईतील सूत्रांच्या माहितीनुसार, कतरिनाने अद्याप रिसेप्शनसाठी इंडस्ट्रीतील कोणालाही आमंत्रित केलेले नाही. आश्चर्य म्हणजे खान कुटुंबीयांनाही आत्तापर्यंत निमंत्रित केलेले नाही.
Post a Comment