सातारा जिल्ह्यामध्ये ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटची एंन्ट्री झाली आहे. शनिवारी फलटण तालुक्यातील रुग्णांची तपासणी अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळले आहेत. फलटण शहरामध्ये आठ दिवसांपूर्वी परदेशातून एक कुटुंब आले आहे. या कुटुंबातील पती, पत्नी आणि दोन लहान मुले कोरोनाबाधित आढळली होती. या कुटुंबाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते.
दरम्यान, ओमायक्रॉनचे रुग्ण आढळळ्याच्या पार्श्वभीमीवर जिल्हा प्रशामनाने अलर्ट जारी केला आहे. आरोग्य यंत्रणेकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मास्क लावणे, सॅनिटायझर, वेळोवेळी हात धुणे, गर्दी जाणे टाळणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालणे करणे, असे आवाहन प्रशासनाने वेळोवेळी केले आहे.
Post a Comment