धक्कादायक : माहेरून पैसे आणावेत यासाठी महिलेचे केस कापून घरातून हाकलून दिले

 


सलाबतपूर 


चारचाकी गाडी (Car) घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये (Two Lakh Rupees Demand) आणावेत यासाठी महिलेच्या (Woman) डोक्यावरील केस कापून मारहाण (Beating) करुन तिला घरातून हाकलून देवून जीवे ठार मारण्याची धमकी (Threat) दिल्याची घटना तालुक्यातील नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) सलाबतपूर (Salabatpur) येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन पतीसह सासू व सासर्‍यांवर नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पल्लवी किशोर भगत (वय 25) रा. नजन वस्ती सलाबतपूर ता. नेवासा हिने फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 28 जुलै 2018 रोजी लग्न झाल्यानंतर सहा महिने ते 15 डिसेंबर 2021 या काळात सासरी नांदत असताना पती किोशर अर्जुन भगत याने आई-वडिलांकडून चारचाकी गाडी घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत यासाठी वेळोवेळी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.


15 डिसेंबर 2021 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पती किशोर अर्जुन भगत याने पैसे का आणत नाहीस? असे विचारले. त्यावर आई-वडील गरीब असल्याने पैसे देवू शकणार नाहीत. असे सांगितल्याचा राग आल्याने त्याने डोक्यावरचे केस कात्रीने कापून घरातून काढून दिले. सासू सरस्वती अर्जुन भगत व सासरे अर्जुन काशिनाथ भगत यांनी वेळोवेयी उपाशी ठेवून वाइरट शिवीगाळ केली.


या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर फर्स्ट 963/2021 भारतीय दंड विधान कलम 498(अ), 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार नितीन भताने करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post