शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या प्रतिमेस महिलांनी मारले जाेडे



 नगर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीने महिलेचे लैंगिक शोषण करणार्‍या आरोपीस उमेदवारी जाहीर केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या प्रतिमेस जोडे माेरो आंदोलन करण्यात आले.


सर्जेपूरा कराचीवालानगर येथे झालेल्या या आंदोलनात आरपीआय महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अलका बुरुडे, संपदा म्हस्के यांनी आंदाेलनाचे नेतृत्व केले. पीडित महिलेचे नाव निवेदनात नमुद करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आरपीआयने यावेळी करण्यात आली.



गोविंद मोकाटे यांनी एका मागासवर्गीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महिलेला न्याय मिळण्याअगोदरच राजकीय दबाव आणून आरोपीला पाठिशी घालण्याचे काम केले जात असून, आरोपी फरार असताना या आरोपीची जिल्हा परिषद निवडणुसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी उमेदवारी जाहीर केल्याचा निषेध नोंदविण्यासाठी आरपीआयतर्फे आंदोलन करण्यात आले.



शकीला शेख, स्मिता गायकवाड, ममता चौधरी, सुरैय्या शेख, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, नईम शेख, अजीम खान, विजय शिरसाठ, जावेद सय्यद, सुयोग बनसोडे, अभिजित पंडित, उमेश गायकवाड, आकाश सोनवणे आदी सहभागी झाले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post