चेहरा धुवून घ्या.
चेहऱ्यावर स्टीम घेण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे धुणे आवश्यक आहे. जर चेहरा स्वच्छ नसेल तर छिद्र उघडल्यावर घाण बाहेर पडू शकत नाही आणि त्यामुळे मुरुमांची समस्या उद्भवू शकते.
खूप जवळून स्टीम घेऊ नका
स्टीम खूप जवळून घेतल्याने त्वचेचं नुकसान होऊ शकतं. यामुळे त्वचा जळू शकते. स्टीम घेताना चेहरा पाण्याच्या जास्त जवळ घेऊ नका.एकाच वेळी खूप साहित्य टाकू नका
पाण्यात अनेक प्रकारचे इंग्रेडिएंट्स एकाच वेळी टाकून स्टीम घेऊ नका. त्याच वेळी, हे लक्षात ठेवा की, स्टीम घेण्यासाठी स्टीलचे भांडे निवडा, अॅल्युमिनियम नाही. स्टीमरमध्ये इंग्रेडिएंट्स टाकल्याने स्टीमर खराब होऊ शकतो.
Post a Comment