अबब! नगरमध्ये कोरोनाच उद्रेक



 आज 244 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 1432 बाधितांची रुग्ण संख्येत भर

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.43 टक्के*

माय अहमदनगर वेब टीम- 

 जिल्ह्यात आज 244 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 53 हजार 234 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.43 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 1432 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 5926 इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 327 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 731 आणि अँटीजेन चाचणीत 374 रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 86, अकाले 19, जामखेड 15,  कर्जत 19, कोपरगांव 01, नगर ग्रा. 26, नेवासा 12, पारनेर 42, पाथर्डी 13, राहुरी 08, संगमनेर 38, शेवगांव 03, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 18, कॅन्टोनमेंट बोर्ड 03, मिलिटरी हॉस्पिटल 05, इतर जिल्हा 13 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 300, अकोले 16, जामखेड 06, कर्जत 04, कोपरगाव 06,  नगर ग्रा. 56, नेवासा 21, पारनेर 61, पाथर्डी 19, राहाता 87, राहुरी 13, संगमनेर 06, शेवगाव 12, श्रीगोंदा 16, श्रीरामपूर 53, कॅन्टोन्मेंट बोर्ड 11, मिलिटरी हॉस्पिटल 13, इतर जिल्हा 29, इतर राज्यी 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज 374 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 136, अकोले 13, जामखेड 07, कर्जत 11, कोपरगाव 27, नगर ग्रा. 37, नेवासा 19, पारनेर 06, पाथर्डी 41, राहाता 26, राहुरी 09, संगमनेर 04, शेवगांव 12, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 07, कॅन्टोन्मेंट बोर्ड 05, मिलिटरी हॉस्पिटल 02 आणि इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 84, अकोले 12, जामखेड 01, कर्जत 03, कोपरगाव 19, नगर ग्रा 24, नेवासा 07, पारनेर 10, पाथर्डी 11, राहाता 10, राहुरी 06, संगमनेर 13, शेवगांव 01, श्रीगोंदा 07, श्रीरामपूर 12, कॅन्टोनमेंट बोर्ड 04, इतर जिल्हा 18 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:3,53,234*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:5926*

*पोर्टलवरील मृत्यू नोंद:7163*


*एकूण रूग्ण संख्या:3,66,323*

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post