माय अहमदनगर वेब टीम-
टीआरपी आणि ब्रेकिंग न्युज च्या हव्यासापोटी नकारात्मक बातम्यांकडे कल वाढत चालला आहे. सकारात्मक पेक्षा नकारात्मक बातम्यांना ठळक पणे आणि प्रमुख म्हणून छापल्या जातात.त्यातून टीआरपी वाढत असेल पण समाजाला पुढं घेऊन जाणारी आणि दिशा देणारी पत्रकारिता ही सकारात्मक पत्रकारीतच आहे असे प्रतिपादन पदमश्री पोपटराव पवार यांनी केले.
नगर तालुक्यातील कै माजी खासदार दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पत्रकार दिनाच्या औचित्यावर आयोजित आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले होते.यावेळी सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुरेश सुंबे, रेवणनाथ चोभे, आदि उपस्थित होते.यावेळी बोलताना पोपटराव पवार म्हणाले की मी आणि माजी आमदार कर्डीले बरोबर सरपंच होतो.बाजार समिती ,पंचायत समिती सदस्य म्हणून राहिलो पण पुढे राजकारण की गाव असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी आपण गावाला प्राधान्य दिले आणि गावातच काम करण्याचा निर्णय घेतला.पैशाने गावे उभी रहात नाहीत तर विचारांनी गावे उभी रहातात.मला जरी पदमश्री मिळाला असला तरी तो गावकऱयानी केलेल्या कष्टचे आणि दिलेल्या त्यागाचे ते फळ आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांची पत्रकारिता करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.समाजाला पुढं घेऊन जाणारी पत्रकारिता असली पाहिजे.नकारात्मक नाही तर सकारात्मक पत्रकारिताच समाजाला दिशा देईल आणि पुढे घेऊन जाईल. यावेळी दिव्य मराठी चे नगर तालुका प्रतिनिधी जितेंद्र निकम यांसह लोकमतचे योगेश गुंड, पुण्यनगरी चे बाळासाहेब गदादे, दिव्य मराठी चे पाथर्डी तालुका प्रतिनिधी अविनाश मंत्री यांना आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी तर आभार बाबासाहेब खरसे यांनी मानले.
पत्रकार हा समाजाचा आरसा
पत्रकार बातम्यांच्या माध्यमातून समाजातील घडामोडी आणि प्रश्न मांडत असतात. त्यामुळे आम्हाला काम करताना दिशा मिळते. कोणते प्रश्न तातडीचे आणि अति महत्वाचे आहेत ते समजते. नगर तालुक्यातील पत्रकारांची मोठी साथ कायम मिळत आहे. पत्रकार हा आरसा दाखविण्याचे काम करतात, असे माजी मंत्री कर्डीले म्हणाले.
तालुक्यातील प्रश्नांसाठी पद्मश्री यांची साथ हवी
नगर बाजार समितीने काळाच्या ओघात स्वतः मध्ये बदल केला म्हणून आज बाजार समिती चे राज्यातील क्रमांकाचे स्थान अबाधित आहे. दुष्काळ काळात चारा छावण्या, कोविड काळात कोविड सेंटर सुरू करून लोकांना आधार दिला. तालुक्यातील पाण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आमदार कर्डीले यांनी घोसपुरी आणि बुऱ्हाणनगर पाणी योजनांच्या माध्यमातून सोडवला , इतर अनेक कामेही झाली.पण साकलाई पाणी योजना, घोसपुरी एमआयडीसी , वांबोरी चारी चा दुसरा टप्पा असे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे बाकी आहेत.तालुक्याला हक्काचा आमदार नाही .पदमश्री पोपटराव पवार यांनी याकामी लक्ष घेतल्यास हे प्रश्न सुटू शकतील अशी अपेक्षा पत्रकार जितेंद्र निकम यांनी व्यक्त केली.कारिताच समाजाला पुढे नेऊ शकेल- पद्मश्री पोपटराव पवार
माय अहमदनगर वेब टीम-
टीआरपी आणि ब्रेकिंग न्युज च्या हव्यासापोटी नकारात्मक बातम्यांकडे कल वाढत चालला आहे. सकारात्मक पेक्षा नकारात्मक बातम्यांना ठळक पणे आणि प्रमुख म्हणून छापल्या जातात.त्यातून टीआरपी वाढत असेल पण समाजाला पुढं घेऊन जाणारी आणि दिशा देणारी पत्रकारिता ही सकारात्मक पत्रकारीतच आहे असे प्रतिपादन पदमश्री पोपटराव पवार यांनी केले.
नगर तालुक्यातील कै. माजी खासदार दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पत्रकार दिनाच्या औचित्यावर आयोजित आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले होते.यावेळी सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुरेश सुंबे, रेवणनाथ चोभे, आदि उपस्थित होते.यावेळी बोलताना पोपटराव पवार म्हणाले की मी आणि माजी आमदार कर्डीले बरोबर सरपंच होतो.बाजार समिती ,पंचायत समिती सदस्य म्हणून राहिलो पण पुढे राजकारण की गाव असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी आपण गावाला प्राधान्य दिले आणि गावातच काम करण्याचा निर्णय घेतला.पैशाने गावे उभी रहात नाहीत तर विचारांनी गावे उभी रहातात.मला जरी पदमश्री मिळाला असला तरी तो गावकऱयानी केलेल्या कष्टचे आणि दिलेल्या त्यागाचे ते फळ आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांची पत्रकारिता करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.समाजाला पुढं घेऊन जाणारी पत्रकारिता असली पाहिजे.नकारात्मक नाही तर सकारात्मक पत्रकारिताच समाजाला दिशा देईल आणि पुढे घेऊन जाईल. यावेळी दिव्य मराठी चे नगर तालुका प्रतिनिधी जितेंद्र निकम यांसह लोकमतचे योगेश गुंड, पुण्यनगरी चे बाळासाहेब गदादे, दिव्य मराठी चे पाथर्डी तालुका प्रतिनिधी अविनाश मंत्री यांना आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी तर आभार बाबासाहेब खरसे यांनी मानले.
पत्रकार हा समाजाचा आरसा
पत्रकार बातम्यांच्या माध्यमातून समाजातील घडामोडी आणि प्रश्न मांडत असतात. त्यामुळे आम्हाला काम करताना दिशा मिळते. कोणते प्रश्न तातडीचे आणि अति महत्वाचे आहेत ते समजते. नगर तालुक्यातील पत्रकारांची मोठी साथ कायम मिळत आहे. पत्रकार हा आरसा दाखविण्याचे काम करतात, असे माजी मंत्री कर्डीले म्हणाले.
तालुक्यातील प्रश्नांसाठी पद्मश्री यांची साथ हवी
नगर बाजार समितीने काळाच्या ओघात स्वतः मध्ये बदल केला म्हणून आज बाजार समिती चे राज्यातील क्रमांकाचे स्थान अबाधित आहे. दुष्काळ काळात चारा छावण्या, कोविड काळात कोविड सेंटर सुरू करून लोकांना आधार दिला. तालुक्यातील पाण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आमदार कर्डीले यांनी घोसपुरी आणि बुऱ्हाणनगर पाणी योजनांच्या माध्यमातून सोडवला , इतर अनेक कामेही झाली.पण साकलाई पाणी योजना, घोसपुरी एमआयडीसी , वांबोरी चारी चा दुसरा टप्पा असे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे बाकी आहेत.तालुक्याला हक्काचा आमदार नाही .पदमश्री पोपटराव पवार यांनी याकामी लक्ष घेतल्यास हे प्रश्न सुटू शकतील अशी अपेक्षा पत्रकार जितेंद्र निकम यांनी व्यक्त केली.
Post a Comment