नगरकरांच्या चिंतेत भर



*आज 72 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 170 बाधितांची रुग्ण संख्येत भर*

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.83 टक्के*

माय अहमदनगर वेब टीम

जिल्ह्यात आज 72 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 839 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.83 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 170 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 660 इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 44, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 85 आणि अँटीजेन चाचणीत 41 रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 11, जामखेड 02, कर्जत 01  कोपरगाव 01, नगर ग्रा. 08, नेवासा 04,  पारनेर 03, शेवगांव 03,  कॅन्टोनमेंट बोर्ड 02, मिलिटरी हॉस्पिटल 06 आणि इतर जिल्हा 02 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 34, अकोले 02, कोपरगाव 03, नगर ग्रा. 06, नेवासा 01, पारनेर 01, पाथडी 02, राहाता 11, राहुरी 02, संगमनेर 04, श्रीगोंदा 07, श्रीरामपूर 04, कॅन्टो्नमेंट बोर्ड 02, मिलिटरी हॉस्पिटल 01, इतर जिल्हा 04 आणि इतर राज्ये 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज 41 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 14, अकोले 01, जामखेड 06, कर्जत 01, नगर ग्रा.01, नेवासा 01, पारनेर 02, पाथर्डी 06, राहाता 06, श्रीरामपूर 01, कॅन्टोन्मेंट बोर्ड 01 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 13, अकोले 02, जामखेड 01, नगर ग्रा 03, नेवासा 01, पारनेर 04, पाथर्डी 06, राहाता 04, राहुरी 01, संगमनेर 10, शेवगांव 01, श्रीगोंदा 17, श्रीरामपूर 07, इतर जिल्हा 01 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:3,51,839*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:660*

*पोर्टलवरील मृत्यू नोंद:7157*

*एकूण रूग्ण संख्या:3,59,656*

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post