आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त सविता लांडे यांचा निंबळक ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

 

माय अहमदनगर वेब टीम

नगर तालुका-- नगर तालुक्यातील निंबळक येथील ग्रामविकास अधिकारी सौ. सविता लांडे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार निंबळक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. 

       सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्या वतीने राज्यातील पाच ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये सौ. सविता लांडे यांना आदर्श ग्रामसेवक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सविता लांडे यांचा सत्कार करण्यात आला.

      याप्रसंगी सरपंच प्रियंका लामखडे, केतन लामखडे, श्रीकांत शिंदे, कानिफनाथ कोतकर, भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब कोतकर, समीर पटेल, भाऊराव गायकवाड, दत्तात्रय दिवटे, प्रांजलीताई लामखडे, अनिता गायकवाड, कोमल शिंदे, बि.डी.कोतकर, मोहिनी कोतकर, सोमनाथ खांदवे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_______________________

 सत्कार रूपी कार्याची पावती

 सौ. सविता लांडे यांनी अतिदुर्गम आदिवासी पेंडशेत गावात केलेले कार्य तसेच दुष्काळी पट्ट्यातील धनगरवाडी गावाला दोन पुरस्कार मिळवून दिले आहेत. निंबळक गावात चारच महिन्यात सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांना सोबत घेत ग्राम विकासासाठी घेतलेले निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या कार्याची पावतीच आहे.

..... प्रियंका अजय लामखडे (सरपंच निंबळक)

----------------------


पुरस्कार हा पदाधिकारी व ग्रामस्थांचा

मला मिळालेला आदर्श ग्रामसेवक हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून मी ज्या गावात काम केले तेथील पदाधिकारी व ग्रामस्थांचा सहकार्यामुळेच ग्राम विकासाचे निर्णय घेता आले. पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळेच पेंडशेत गावाला निर्मल ग्राम पुरस्कार तर धनगरवाडी गावाला दोन पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे हा पुरस्कार माझा नसून पदाधिकारी व ग्रामस्थ यांचाच आहे.

.....सौ सविता लांडे (आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामविकास अधिकारी)

_______________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post