तुझा काटाच काढतो ; माजी नगरसेवकाला पुन्हा धमकी




माय अहमदनगर वेब टीम -

 नगर शहरातील शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांविरुद्ध धमक्यांचं सत्र सुरूच आहे. युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड यांना रामनवमी मिरवणुकीत धक्का देऊन, तसेच कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिसात गजेंद्र प्रकाश सैंदर (रा.नगर) याच्यासह चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


राठोड यांनी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, १० एप्रिलला नेताजी सुभाष चौकात रामनवमी मिरवणुकीच्या स्वागतासाठी राठाेड उभे होते. त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी मिरवणुकीचे स्वागत करून मिरवणुकीत नाचत असताना गजेंद्र सैंदर याने राठोड यांना धक्का दिला व त्याच्यासोबत आलेल्या त्याच्या साथीदारांनी राठोड यांना मारण्याच्या उद्देशानं त्यांना घेराव घातला. राठोड यांच्या सहकार्यांनी त्यांना तेथून बाहेर काढलं. त्यानंतर दहा मिनिटांनी मिरवणुकीतून जात असताना गजेंद्र सैंदर यानं कोयत्याचा धाक दाखवून राठोड यांना जीवे मारण्याच्या उद्देशानं 'तू इकडे ये, मिरवणुकीत तुझा काटाच काढतो', असा दम दिला. 


 सैंदर व त्याचे साथीदार काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या उद्देशानं राठोड यांचा पाठलाग करत असल्याचेही फिर्यादीत म्हटलं आहे. राठोड यांनी याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर बुधवारी त्यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post