माय अहमदनगर वेब टीम
शहरात साचलेला कचरा उचलण्यात यावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा आयुक्त शंकर गोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. "तीन दिवसात कचरा संकलनाचा प्रश्न मार्गी लावू. अन्यथा एजन्सीवर दंडात्मक कारवाई करू", असे आश्वासन आयुक्त गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले.
शहरात प्रतिदिन उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याबाबत महापालिका घनकचरा विभाग व एजन्सीच्या दिरंगाई करत आहे. त्यामुळे शहरामध्ये कचऱ्याचे ढीग दिसत आहे. महापालिका प्रशासनाचा कचरा संकलन करणाऱ्या एजन्सीवर कोणताही धाक राहिला नाही. यामुळे शहराच्या चौकात, बाजारपेठामध्ये, रस्त्यांवर कचरा साचलेल्या अवस्थेत पाहावयास मिळतो. कचऱ्याचे योग्य रीतीने संकलन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे साचलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरल्याचे निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, प्रा. अरविंद शिंदे, सागर गुंजाळ, गणेश बोरुडे, वैभव ढाकणे, अमित खामकर, गजेंद्र भांडवलकर आदी निवेदन देताना उपस्थित होते.
Post a Comment