आईच्या आशीर्वादाने मनुष्याचे जीवन सुकर बनते- भाऊ कोरगावकर

 माय अहमदनगर वेब टीम

नगर तालुका--आईच्या आशीर्वादाने मनुष्याचे जीवन सुकर बनत असून जगात प्रत्येकाच्या पाठीशी आईचे आशीर्वाद असणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते भाऊ कोरगावकर यांनी व्यक्त केले.

      बहिरवाडी येथील संतोष बलभीम दारकुंडे, दत्तात्रय दारकुंडे, नंदू दारकुंडे या तीन बंधूंनी आई कौशल्या दारकुंडे हिच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव साजरा केला. त्या प्रसंगी बोलताना भाऊ कोरगावकर यांनी मनुष्याच्या जीवनात आईचे आशीर्वाद हे फार महत्त्वाचे असतात. सर्वांनी आपल्या आई-वडिलांची सेवा करणे गरजेचे आहे. दारकुंडे बंधूंनी आपल्या आईच्या प्रेमापोटी साजरा केलेला अमृत महोत्सव सोहळा इतरांसाठी प्रेरणादायी तसेच आदर्श घेण्यासारखा असल्याचे कोरगावकर यांनी सांगितले.

       बहिरवाडी सारख्या खेड्यात जन्म घेऊन दारकुंडे बंधूंनी मुंबईतच नव्हे तर परदेशात आपले नाव कमाविले हे सर्व आईच्या आशीर्वादाने घडले आहे. जेथे आईची पूजा होते तेथेच देव नांदतो, असेही कोरगावकर यांनी सांगितले.

     कौशल्या दारकुंडे यांचा अमृत महोत्सव सोहळ्याप्रसंगी दारकुंडे बंधुंनी गावातील ७५ महिलांना साड्यांचे वाटप केले. तसेच संपूर्ण ग्रामस्थांना हरिपाठाचे वाटप करून धार्मिक क्षेत्रातील त्यांचे योगदान दाखवून दिले. दारकुंडे बंधूंनी मुंबईत आपल्या व्यवसायाला चालना दिली असली तरी आपली जन्मभूमी असणाऱ्या बहिरवाडी गावाची नाळ कधी तुटू दिली नाही असे भाजप तालुका उपाध्यक्ष राजेंद्र दारकुंडे यांनी सांगितले. याप्रसंगी आर्केस्ट्रा, मॅजिक शो चे आयोजन करण्यात आले होते. दारकुंडे बंधूंचे आपल्या आई प्रती असलेल्या प्रेमाची भावना पाहून बहिरवाडी गाव गहिवरून गेले होते. 

      याप्रसंगी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, मुंबई नगरसेवक विजेंद्र शिंदे, माजी अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती रघुनाथ झिने, उद्योजक संजय चव्हाण, अक्षय कर्डिले, दत्तात्रय सप्रे, किरण कातोरे, नगरसेवक राजेश कातोरे, सरपंच अंजना येवले, श्रीनाथ कृपा इंजीनियरिंग चे संचालक विजय दारकुंडे यांच्यासह बहिरवाडी तील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

__________________________________________________

आईची सेवा हिच ईश्वर सेवा

आईची सेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा आहे. आज आम्ही उद्योग क्षेत्रात देशात परदेशात नाव कमविले असले तरी ते केवळ आईमुळेच घडलेले आहे. आईने मोठ्या कष्टाने आम्हाला घडवले. आईच्या पुण्याईतून उतराई होणे शक्य नसले तरी आईचा अमृत महोत्सव साजरा करून आम्ही आईबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त केली आहे.

...... संतोष बलभिम दारकुंडे (उद्योजक मुंबई)

________________________________________


दारकुंडे बंधुंचे प्रेरणादायी कार्य

संतोष दारकुंडे व त्यांच्या बंधूंचे सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी आहे. आज त्यांनी गावातील आराध्य दैवत भैरवनाथ मंदिर यासाठीदेखील देणगी दिली आहे. आईच्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव सोहळा साजरा करून आई प्रति असलेले प्रेम, कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांचा आदर्श समाजातील इतर नागरिकांनी, नविन पिढीने घेण्याची गरज आहे.

..... राजेंद्र दारकुंडे (भाजप तालुका उपाध्यक्ष)

_____________________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post