अत्यंत धक्कादायक; माथेफीरुने अख्ख कुटुंब संपवलं



माय अहमदनगर वेब टीम -

 श्रीरामपूर येथे रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र यंदाच्या रामजन्मोत्सवापूर्वीच श्रीरामपूर तालुका हादरला आहे. एका माथेफिरू पतीने स्वतःची पत्नी व चार वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. या संदर्भात श्रीरामपूर पोलिस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथे चितळी रस्त्यावर कौटुंबिक वादातून पतीने पत्नी व मुलाचा खून केल्याची दुर्दैवी घटना सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली. रामनवमीच्या दिवशी रामजन्मोत्सवापूर्वी घडलेल्या या घटनेने तालुका हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.अक्षदा बलराज कुदळे ( वय 28 ) व शिवतेज बलराज कुदळे ( वय साडेचार वर्षे) अशी खून झालेल्या मायलेकांची नावे आहेत. बलराज दत्तात्रय कुदळे (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास बलराज याने प्रथम पत्नीच्या डोक्यात कुदळीने घाव घातला व नंतर मुलाला आंब्याच्या झाडाला गळफास दिला.

         घटनेनंतर बलराजने आपल्या चाकण येथील मेव्हण्याला व्हिडिओ कॉल करून घटनेची माहिती व मृत्यूमुखी पडलेल्या पत्नी व मुलाला दाखविले. त्यांचे फोटो काढून नातेवाईकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही टाकले. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिस ठाण्यात अक्षदाच्या माहेरकडील मंडळी मोठ्या प्रमाणात जमली होती. या घटनेने संतापाबरोबरच हळहळ व्यक्त केली जात होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post