माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- - नगर शहरातील बुरूडगाव रोडवरील किडझी स्कूल साईनगर शाखा येथे दि इंडियन पावर मार्शलआर्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कराटेच्या विविध बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अरुणोदय क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षेत आदित्य भंडारी,सम्यन कोठारी, कुंजल चोपडा, काव्या भंडारी यांनी ब्लू बेल्ट मिळविला आहे. तर कार्तिक मोढवे, मेहेक मुथा, प्रीशा गुजराती, अर्चित आंबेकर,अर्णव चंगेडिया यांनी ग्रीन बेल्ट मिळविला. मायर चोपडा, आदिती सिंग, अमेय जगताप, आर्वी मडोरे,धैर्य जांगडा यांनी ऑरेंज बेल्ट मिळविला.
तसेच यलो बेल्ट परीक्षेतही अरुणोदय केंद्राच्या खेळाडूंनी मोठे यश मिळविले असून यामध्ये कियाना खत्ती, रिदाश गुप्ता, हर्षवर्धन महाडिक, विभूती कुंभार, सिया साखला, शरायू गांधी, तनिष्का मेहेर, श्रद्धा लांडगे, शौर्य जांगडा, ओम ओसेकर, कोशिंग बंग, हर्षिता मडोरे, अवनी जायभाय, श्रेयस घबाडे, नक्षत्र कर्डीले, कार्तिक पटारे, अनंत शिंदे, आगम चोपडा, मोहम्मद अली, राजवी जगताप, श्रद्धा घबाडे, तेजस फिरोदिया यांचा समावेश आहे.
या सर्व खेळाडूंना अरुणोदय क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे संचालक महेश आनंदकर, प्रशिक्षक प्रणाली कडूस, क्रिशा चंगेडिया, रुद्राली गुंजाळ, पंपिता बिश्वास, वृषाली धामणे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंचे आ. संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, लेबर फेडरेशनचे अध्यक्ष विकी जगताप, अरुणोदय प्रशिक्षण केंद्राचे मार्गदर्शक विशाल पवार, सचिन कानडे, समता बोरा, मिलींद विधाते यांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment