माय अहमदनगर वेब टीम
२७ कोटी ठेवींचा टप्पा ओलांडला | लवकरच चार नवीन शाखा सुरु करणार
नगर तालुका - कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षात अनेक अडचणीचा सामना मराठा सेवा संघ व पतसंस्थेला करावा लागला. मात्र त्यातून उभारी घेत मराठा सेवा संघ प्रणीत मराठा पतसंस्था नेत्रदिपक प्रगती करत आहे. आज मराठा पतसंस्थेच्या ठेवींनी २७ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. कर्ज वितरण २१ कोटी झाले आहे. २०८ कोटींची वार्षिक उलाढाल असून ५ लाख ४५ हजार निव्वळ नफा आहे. संस्थेचे कामकाज मुख्य कार्यालयासह मार्केटयार्ड, अहमदनगर, भिंगार, संगमनेर, पाथर्डी व नेवासा येथे कार्यरत असून लवकरच चार तालुक्यात नवीन शाखा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुरेश इथापे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
इंजि. इथापे म्हणाले, मराठा सेवा संघाची स्थापना ही समाज परिर्वतन करणे, समाज विज्ञाननिष्ठ करत रुढी परंपरा मुक्त करणे तसेच समाजाच्या अडचणी सोडवत समाज विकसित करणे आदी उद्देशाने झाली आहे. अहमदनगर जिल्हयात सर्वच तालुयात मराठा सेवा संघाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. मराठा सेवा संघ ३३ विविध कक्षाच्या माध्यमातून कार्यरत आहे.
कोरोना काळात संघटना बांधताना अनेक अडचणी आल्या. मात्र संघाने समाजिक बांधिलकी जपत सुमारे पाच हजार कुटुंबाना धान्य व किराणा वाटप केले. अनेक कोरोना रुग्णांना दिलासा देत त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचे काम करतानाच त्यांच्या औषधोपचारासाठी आर्थिक सहकार्य केले. विदयार्थ्यांना शालेय साहित्य व अन्नधान्याचे वाटप केले. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा जाणवताच नगर शहरात ६ जून या शिवराज्य अभिषेक दिनाचे औचित्य साधत भव्य रक्तदान शिबिर घेत सुमारे १०८ बाटल्या रक्तदान केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून सर्वच तालुयात प्रबोधनाचे कार्यक्रम केले. येत्या काळात अहमदनगर शहरात मराठा सेवा संघाचे भव्य कार्यालय, विदयार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणार आहोत.
मराठा सेवा संघाने समाजाला अर्थिकदृष्टया संपन्न करण्यासाठी, समाजातील तरूनांना व्यवसाय उभारणी, समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मराठा पतसंस्था स्थापन केली. मराठा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. विजयकुमार ठुबे यांच्यासह मराठा पतसंस्थेचे व्हा. चेअरमन सतीशराव इंगळे, संचालक प्रा. पोपटराव काळे, ज्ञानदेव पांडुळे, काशिनाथ डोंगरे, पत्रकार किशोर मरकड, ज्ञानेश्वर अनभुले, सीए. विश्वास कारजंकर, राजश्री शितोळे, निर्मलाताई गिरवले, शोभाताई जाधव, मानद सचिव राजेंद्र ढोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोकराव वारकड, सहव्यवस्थापक बबनराव सुपेकर, शाखाधिकारी अशोक अरगडे, अनुपमा भापकर, महेश नलवडे, प्रितेश बोरूडे आदींच्या नेतृत्व व कर्तव्यकुशलतेने आज संस्थेने ठेवींचा २७ कोटींचा टप्पा ओलाडला असून कर्ज वितरण सुमारे २१ कोटी झाल्याचे इथापे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सतीश इंगळे, संचालक उदय अनभुले, राजश्री शितोळे, राजेश परकाळे, राजेंद्र निंबाळकर आदी उपस्थित होते.
__________________________________________
मराठा सेवा संघ, पतसंस्थेतर्फे कृतज्ञता सन्मान सोहळा
मराठा सेवा संघ अहमदनगर व मराठा पतसंस्थेच्यावतीने मंगळवार ३ मे २०२२ रोजी माऊली सभागृहात कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात शिवश्री दादाभाऊ कळमकर, जी. डी. खानदेशे, शिवमती मंदाताई निमसे यांना जीवनगौरव, डॉ. राजेंद्र धामणे, डॉ. सुचिता धामणे यांना कर्म तपस्वी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे वितरण मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजि. विजय घोगरे उपस्थित राहणार आहेत.
Post a Comment