आमदार लंके यांच्याकडून सुशोभीकरणासाठी ३८ लाखांचा निधी
माय अहमदनगर वेब टीम -
नगर तालुका - नगर तालुक्यातील निंबळक येथील खंडोबा मंदिर लवकरच "ग्रीन अँड क्लीन" होणार असून मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आमदार निलेश लंके यांनी ३८ लाखांचा निधी दिला आहे. मंदिर सुशोभीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.
निंबळक येथील 'क' वर्ग तीर्थक्षेत्रात असलेल्या खंडोबा मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असून सदर कामाची पाहणी सरपंच सौ. प्रियंका लामखडे व ग्रामविकास अधिकारी सौ. सविता लांडे यांनी केली. मंदिर सुशोभीकरणाचे काम दर्जेदार करणे बाबत सूचना सरपंच प्रियंका लामखडे यांनी दिल्या.
आमदार निलेश लंके यांनी खंडोबा मंदिर तीर्थक्षेत्राच्या सुशोभीकरणासाठी सुमारे ३८ लाख रुपयांचा निधी दिला आहे. या निधीमधून पेव्हिंग ब्लॉक बसविणे, भक्त निवास, स्ट्रीट लाईट चे कामे करण्यात येणार आहेत. निंबळक गावचा यात्रोत्सव वैशाख बुद्ध पौर्णिमेला असतो. यात्रोत्सवापूर्वी सदर कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या वतीने खंडोबा मंदिर तीर्थक्षेत्राला दहा लाख रुपयांचा संरक्षण भिंतीसाठी निधी देण्यात आला आहे. जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे व सरपंच सौ. प्रियंका लामखडे खंडोबा मंदिर सुशोभीकरणाचे काम दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
निंबळक ग्रामपंचायतच्या वतीने आमदार निलेश लंके यांच्याकडे मंदिर सुशोभीकरणासाठी निधी मागण्यात आला होता. सरपंच प्रियंका लामखडे, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नातून आमदार लंके यांनी मंदिरासाठी सुमारे ३८ लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्याबद्दल ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आमदार लंके यांचे आभार मानले.
तीर्थक्षेत्र खंडोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण व सुशोभीकरण करण्यात येणार असल्याने हा परिसर 'ग्रीन अँड क्लीन' होणार आहे. त्यामुळे निंबळक ग्रामस्थांमध्ये ही समाधानाचे वातावरण आहे.
______________________
पर्यटकांची गर्दी वाढणार
निंबळक गावचे आराध्य दैवत खंडोबा मंदिर सुशोभीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. आमदार निलेश लंके तसेच जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी दिलेल्या निधीतून मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर, हिरवागार बनणार आहे. त्यामुळे येथील पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. आमदार निलेश लंके यांचे निंबळक ग्रामस्थांच्या वतीने आभार.
अजय लामखडे (युवा नेते)
__________________
ग्रामपंचायत कार्यालयाचे कौतुक
गावच्या सरपंच सौ. प्रियंका लामखडे, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी गावचे आराध्य दैवत खंडोबा तीर्थक्षेत्रा साठी निधी मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे ग्रामस्थांच्यावतीने निंबळक ग्रामपंचायत कार्यालयाचेही कौतुक करण्यात येत आहे.
_________________
जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे तसेच ग्रामपंचायत कार्यालय नेहमीच गाव विकासासाठी चांगले निर्णय घेताना दिसून येत आहेत. निंबळक गावाला एक कुटुंब समजून प्रत्येक नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे व ग्रामपंचायत च्या माध्यमातून सरपंच सौ. प्रियंका लामखडे करत असलेल्या कार्याची तालुक्यात चर्चा होत आहे.
__________________
Post a Comment