पाण्याच्या टँकर साठी 'या' गावांनी दिला आंदोलनाचा इशारा

माय अहमदनगर वेब टीम 

पावसाळ्यात टँकर सुरू करणार का ? ग्रामस्थांचा संतप्त सवाल

नगर तालुका-- नगर तालुक्यातील इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी या गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असून टँकर पावसाळ्यात सुरू करणार का ? असा संतप्त सवाल युवा नेते गणेश आवारे, माजी उपसरपंच शंकर बळे, चेअरमन शिवाजी मोकाटे यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.

       याबाबत सविस्तर माहिती अशी की, इमामपूर, ससेवाडी, बहिरवाडी गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. गावातील यात्रोत्सव सुरू झाले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची वणवण भटकंती सुरू आहे. इमामपूर, बहिरवाडी तसेच ससेवाडी गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या दरवर्षी उन्हाळ्यात जाणवत आहे. तिन्ही गावांना कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही.

      प्रत्येक वर्षी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. परंतु टॅंकर लवकर सुरू होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गावातील महिला, शाळेतील विद्यार्थी दिवसभर पाण्यासाठी भटकंती करत आहेत. तिन्ही गावे डोंगर उतारावर असल्याने उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. शासन दरबारी प्रस्ताव पाठविण्यात बराच वेळ निघून जात आहे.

      पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करून देखील पाणी मिळत नाही. या गावांनी उन्हाळ्यात विहिरी कोरड्याठाक पडत आहेत. टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करून देखील त्याची शासनाकडून तात्काळ दखल घेतली जात नाही. असा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

       तिन्ही गावांसाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी युवा नेते गणेश आवारे, माजी उपसरपंच शंकर बळे, चेअरमन शिवाजी मोकाटे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

_____________________________________

 'या' गावांची बिकट अवस्था 

इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी या तिन्ही गावांनी पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी महिलावर्गाची वणवण भटकंती सुरू आहे. तिन्ही गावांना पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत नाही. या गावांसाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची गरज आहे. तसेच सद्यपरिस्थितीत तात्काळ टँकर सुरू करावेत. अन्यथा ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल.

.... गणेश आवारे (युवा नेते)

___________________________


वन्य प्राण्यांचे देखील हाल

बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्भगिरीच्या डोंगररांगा असल्याने या डोंगररांगांमध्ये मोठ्या संख्येने वन्य प्राणी आढळून येत आहेत. उन्हाळ्यामध्ये डोंगररांगांमध्ये पाणी नसल्याने वन्यप्राण्यांचे देखील अतोनात हाल होत आहेत. वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ मानव वस्तीकडे धाव घेताना दिसून येतात. तरी वनविभागाने डोंगरांमध्ये पाणवठे बनवून पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

___________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post