माय अहमदनगर वेब टीम
महाविकास आघाडीचे वर्चस्व; कर्डिले गटाला धक्का
नगर तालुका-- नगर तालुक्यातील ससेवाडी सेवा संस्थेत सत्ता परिवर्तन झाले असून येथील सोसायटीमध्ये महाविकासआघाडी गटाची सत्ता आली आहे.
ससेवाडी सेवा संस्थेसाठी एकूण ५०४ सभासद मतदार आहेत. येथे ४८९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. नगर तालुक्यातील गावनिहाय टक्केवारीत सर्वाधिक मतदान हे ससेवाडी गावामध्ये झाले आहे.
येथे महाविकास आघाडी विरुद्ध माजी आमदार शिवाजी कर्डिले गटांमध्ये लढत होती. त्यात महा विकास आघाडीने बाजी मारत ११ पैकी अकरा जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे. येथील दोन जागा त्या प्रवर्गातील उमेदवारांअभावी रिक्तच आहेत.
ससेवाडी सेवा संस्थेत गेल्या पंधरा वर्षापासून माजी आमदार शिवाजी कर्डिले गटाची सत्ता होती. येथे सत्तापरिवर्तन झाले असून प्रथमच येथील सोसायटीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. सर्व उमेदवार हे ७० ते ८० मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत.
माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा जेऊर गट हा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे ससेवाडी येथील सेवा संस्थेच्या निकालाने कर्डिले गटाला धक्का बसला आहे. महाविकास आघाडी पॅनलचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते रामदास भानुदास ससे, डॉ. राजेंद्र ससे, अशोक ससे, रामदास आठरे, रावसाहेब बहिरु ससे, गंगाधर आठरे, नवनाथ आठरे,
सावित्रा ससे, जालींदर ससे यांनी केले होते. विजयानंतर महाविकास आघाडीच्या नूतन संचालकांसह ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला.
____________________
शेतकरी हिताचे निर्णय घेणार
ससेवाडी सेवा संस्थेत मतदारांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. सेवा संस्थेचा कारभार स्वच्छ व पारदर्शी करणार असून शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात येणार आहेत. महा विकास आघाडीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा संस्थेच्या तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्यात येईल.
..... बाबासाहेब ससे ( नूतन संचालक तथा शिवसेना विभागप्रमुख)
_____________________________
Post a Comment