सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय ; मोबाईलमध्ये आढळले महत्वाचे धागेदोरे

 


माय अहमदनगर वेब टीम 


मुंबई _ एसटी संपकऱ्यांचे वकिल अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची 2 दिवसांची पोलिस कोठडी आज संपली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना गिरगाव कोर्टात हजर केले. सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी अधिक चौकशीसाठी त्यांची पुन्हा कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी व सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाकडे केली. त्यानंतर सदावर्तेंचे वकील गिरीश कुलकर्णी यांनीही न्यायालयात बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पुर्ण झाल्यानंतर आता या प्रकरणात न्यायालयाने निर्णय दिला असून गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची (13 एप्रिलपर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे.


न्यायालयात याच प्रकरणात आता वकीलांचा युक्तिवाद झाला. सरकारी वकील प्रदीप घरत न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी सदावर्तेंना 11 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. यानंतर आता सदावर्तेंकडून विधिज्ञ कुलकर्णी बाजू मांडली. तत्पुर्वी प्रदीप घरत यांनी महत्वपुर्ण बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. ती अशी की, सदावर्तेंना हल्ल्याच्या दिवशी नागपूर येथून सदावर्तेंना 11.30 वाजता व्हाट्स ॲप काॅल आला होता. दुसरा कॉल 1.38 वाजता आला होता. जप्त केलेल्या मोबाईलमध्ये महत्वाचे पुरावे आढळले आहेत. पवारांच्या घरावरील हल्ल्याचा सुनियोजित कट होता. 2.42 वाजता पत्रकारांना निरोप गेला. या हल्ल्याची सर्व माहिती सदावर्ते यांना होती. चंद्रकांत सुर्यवंशी हा महत्वाचा संशयित आरोपी अद्याप फरार आहे. सुर्यवंशी हा MJT यु ट्युब पत्रकार आहे. मोहम्मद सादीक शेख हाहीसंशयित आरोपी आहे. सावधान शरद सावधान असे बॅनर होते. सदावर्ते विजयी उत्सव बारामतीत साजरा करणार होते. या सर्व बाबींचा तपास करायचा आहे.​​​​​ सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून 530 रुपये प्रमाणे दीड कोटी रुपये जमा केले. सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांना चुकीची माहिती दिली आहे. नागपूर येथून सदावर्तेंना कुणाचा कॉल आला याचा तपास करायचा आहे. अशी बाब घरत यांनी न्यायालयापुढे मांडली.


या मुद्द्याकडेही वेधले न्यायालयाचे लक्ष


पवारांच्या घरावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, .याद्वारे तपासही सुरू आहे.

अभिषेक पाटील नामक व्यक्तीचाही या कटात सहभाग आहे. कृष्णात कोरे, मोहम्मद शेख, सविता पवार हल्ल्याच्या ठिकाणी होते.

मोहम्मद शेख याने पवारांच्या घराकडे बोट दाखवलेस सर्व कर्मचाऱ्यांना घराकडे जाण्यासाठी प्रवृत्त केले.

गुणरत्न सदावर्ते यांच्या घर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करावी लागणार आहे.

सदावर्ते यांच्या बॅंक खात्याची माहिती काढावी लागणार, त्यांच्या मोबाईलचा तपास बाकी आहे.

हल्ल्याच्या प्रकरणात पत्रकारांचीही चौकशी करणे बाकी आहे.

सदावर्तें यांच्या तर्फे न्यायालयात कुलकर्णी यांनी बाजू मांडण्यास सुरुवात केली. यात 530 रुपये गोळा केल्याची तक्रार एसटी कर्मचाऱ्यांनी दिली का? असा प्रश्न विचारत मग येथे याचा उल्लेख कशासाठी हा मुद्दाही त्यांनी न्यायालयासमोर मांडला.


गिरीश कुलकर्णी न्यायालयात मांडलेले मुद्दे


एसटी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाली. आंदोलकांचा नुकसान करण्याचा हेतू नव्हता.

नागपूरातून फोन आला हा हवेतील आरोप आहे, कुणाशी तरी संबंध दाखवण्यासाठी चुकीचा आरोप लावला.

नागपूराती ती व्यक्ती कोण तपास कसा लागला नाही?

पवारांवरील आंदोलनाला कट म्हणता येणार नाही

हल्ला होणार होता याची पोलिसांना माहिती होती मग पोलिस बंदोबस्त का नव्हता?

सिल्व्हर ओक धक्काबुक्कीत कर्मचारी बेशुद्ध झाला त्याचा वैद्यकीय अहवाल?

चंद्रकांत सुर्यवंशींचा संबंध काय? त्यांनी फक्त सदावर्तेंना कॉल केला होता.

530 रुपये गोळा केल्याचा उल्लेख करून काय साध्य करायचे आहे?एसटी कर्मचाऱ्यांनी स्वःतहून पैसे दिले.

, धक्काबुक्की गेट बंद असताना झाली, गेट उघडल्यानंतर केवळ आंदोलन झाले, धक्काबुक्की नव्हे.

हा सर्व प्रकार यंत्रणांचे अपयश आहे. बारामतीत जाणार हा आंदोलनाचा भार त्यात गैर काय?

सदावर्तेंना कोठडीत घेऊन काय साधणार? कुणी काय निधी गोळा केला याचा प्रकरणाशी संबंध नाही.

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी जनतेचा पैसा, प्रशासनाचा वेळ खर्च होतोय

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post