माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका--नगर तालुक्यातील वाघवाडी येथील श्री नरगिरबाबा संजीवनी समाधी यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती यात्रोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.
यात्रोत्सवा निमित्त त्रिदिनी नामजप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे हे ३६ वे वर्ष आहे. रविवार दि. २४ ते बुधवार दि. २७ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. २४ रोजी ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री येडेश्वरी यांचे किर्तन तर दि. २५ रोजी ह.भ.प. जाधव महाराज उगले, दि २६ रोजी ह.भ.प. अर्चनाताई गिरी यांचे किर्तन होणार आहे. बुधवार दि. २७ रोजी ह.भ.प. परमहंस महाराज मुथ्था यांच्या काल्याचे किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यादरम्यान ह.भ.प. धनंजय महाराज ससे, ह.भ.प. रघुनाथ महाराज तोडमल, ह.भ.प. रमेश महाराज चौधरी यांचे प्रवचन होणार आहे. त्रिदिनी नामजप सोहळा ह.भ.प. सुखदेव महाराज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
यात्रोत्सवासाठी नामदार प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्याचा पंचक्रोशीतील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन यात्रोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment