माय अहमदनगर वेब टीम
जेऊर- नगर तालुक्यातील जेऊर येथे ठिक ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
गेल्या आठ दिवसांपासून जेऊर गावात झेंड्याच्या वादामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परंतु एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे व मंडळाधिकारी वृषाली करोसिया यांनी मध्यस्थी करत दोन्ही समाजाचे प्रतिनिधी यांच्यात बैठक घेऊन वादावर पडदा टाकला.
गावातील तणावपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर सतिष थोरवे मित्र मंडळाच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटोळे, संगम पाटोळे यांनी अभिनव पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करुन समाजासमोर आदर्श ठेवला आहे. विजय पाटोळे यांनी सर्व धर्मीय आंबेडकर जयंती साजरी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन गावातील सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी एकत्र येऊन केले.
यावेळी बोलताना विजय पाटोळे यांनी सांगितले की, जेऊर गावात पुर्वीपासून अठरा पगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. येथे सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने एकमेकांच्या सुख दुःखात, सण यामध्ये सहभागी होत असतात. गावातील वातावरण कलुषीत करण्याचा कोणीही प्रयत्न करु नये. सतिष थोरवे मित्र मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आलेल्या आंबेडकर जयंतीचे पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदन केले असुन यांचा आदर्श सर्वांनी घेण्याची गरज असल्याचे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भास्कर मगर, तालुका अध्यक्ष दत्तात्रय डोकडे, अरुण ससे, अंबादास पवार, बशीर शेख, विकास म्हस्के, बबनराव वाघ, बाबासाहेब मगर, बाळु पाटोळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमामपूर,बहिरवाडी व जेऊर ग्रामपंचायत मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जेऊर पंचक्रोशीतील विविध ठिकाणी आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
----------------
Post a Comment