माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त झालेल्या ग्रामविकास अधिकारी सौ. सविता लांडे यांचा सन्मान करण्यात आला.
धनगरवाडी सोसायटी व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सौ. सविता लांडे यांना सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चेअरमन सुनील शिकारे यांनी दिली.
सौ. सविता लांडे यांनी धनगरवाडी गावामध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करताना विविध विकासाचे निर्णय घेतले. त्यांच्या कार्यकाळात दुष्काळी पट्ट्यातील धनगरवाडी गावाचा सर्वांगीण विकास झाला. तसेच गावाला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पर्यावरण विकासरत्न पुरस्कार व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचे काम करण्याची पद्धत, गाव विकासाचा गाढा अभ्यास व गाव विकासासाठी घेतलेले निर्णय आजही धनगरवाडी ग्रामस्थ मोठ्या अभिमानाने सांगतात. त्यांच्या कार्यकाळात धनगरवाडी गावात झालेली सर्व कामे आजही सुस्थितीत आहेत.
ग्रामविकास अधिकारी लांडे यांच्या कार्याची भुरळ धनगरवाडी ग्रामस्थांना पडली होती. लांडे यांची बदली झाल्यानंतर आज देखील ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या प्रेमाने गाव विकासाबाबत सौ लांडे यांचा सल्ला आपुलकीने घेतात. एवढे घनिष्ठ संबंध धनगरवाडी ग्रामस्थांशी सविता लांडे यांचे जुळले होते. सत्कार प्रसंगी मोठ्या प्रमाणात शेतकरी, महिला सर्वच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रेमाने व स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. सौ. सविता लांडे यांच्या वर प्रेम करणारे, एवढ्या आपुलकीने विचारपूस करणारे लहान थोर पाहून लांडे याही मोठ्या भावुक झाल्या होत्या. तर प्रत्येक धनगरवाडी ग्रामस्थांनाही गहिवरून आले होते.
याप्रसंगी अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती बाजीराव गवारे, बाळासाहेब वाघ, बाळासाहेब शिकारे, युवा नेते सुनील पवार, माजी सरपंच इंद्रभान विरकर, बापूराव तागड, अर्जुन शिकारे, सतीशशेठ थोरवे, सखाराम गवळी, चेअरमन सुनील शिकारे, व्हाईस चेअरमन नवनाथ म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य संदीप शिकारे, उपसरपंच मनीषा गायके, जयाबाई शिकारे, बाबासाहेब शिकारे, अण्णासाहेब कातोरे, रमेश गवळी, एकनाथ विरकर, महादेव भांड, कानिफनाथ शिकारे, वीरेंद्र तोडमल, दत्तू शिकारे, हेमंत शिकारे, संकेत शिकारे, अशोक शिकारे, संजय शिकारे , किसनराव वाकडे, पांडुरंग मंचरे, चेअरमन कलाबाई शिकारे, बाळुमामा देवस्थान समितीचे सदस्य, महादेव मंदिर देवस्थान समितीचे सदस्य, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित नागरिकांनी सौ. लांडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
________________________
--------------------------------------------
सौ सविता लांडे यांचे कार्य प्रेरणादायी
ग्रामविकास अधिकारी म्हणून सौ. सविता लांडे यांचे कार्य प्रेरणादायी राहिलेले आहे. त्यांचा ग्राम विकासाबाबत गाढा अभ्यास आहे. त्यांनी घेतलेले निर्णय व त्यांच्या काळात गावाला मिळालेले पुरस्कार हे धनगरवाडी गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची पावतीच आहे.
..... सुनील शिकारे (चेअरमन)
-------------------------------------------------
--------------------------------------------------
धनगरवाडी गावासाठी ठरलेली "हिरकणी"
दुष्काळी पट्ट्यातील धनगरवाडी गावात ग्रामविकास अधिकारी म्हणून सौ. सविता लांडे यांची नियुक्ती झाली अन् गाव तालुक्याचे नकाशावर झळकायला लागले. गावात केलेल्या कार्यामुळे दोन पुरस्कार मिळाले. सौ.लांडे यांनी धनगरवाडी गावासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. त्यांची धनगरवाडी गावात "हिरकणी" म्हणून प्रतिमा प्रस्थापित झाली आहे.
...... बापूसाहेब तागड
_______________________________
-------------------------------------------------
ऋणाईतुन उतराई होणे अशक्य
समस्त धनगरवाडीकरांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, प्रेम आणि आपुलकीच्या भावनेतून केलेला सत्कार सर्व काही अविस्मरणीय आहे. ग्रामस्थांची एका महिला अधिका-या बद्दल असलेली प्रेमाची, आपुलकीची भावना पाहून भारावून गेले. या ऋणातून उतराई होणे अशक्य आहे.
...... सविता लांडे (ग्रामविकास अधिकारी)
________________________________________
Post a Comment