दुचाकीच्या धडकेत कावडधारक युवक ठार

माय अहमदनगर वेब टीम

इमामपूर शिवारातील घटना 


नगर तालुका- नगर तालुक्यातील इमामपूर शिवारात झालेल्या अपघातात कावड धारक युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. २४ एप्रिल रोजी घडली.

      याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर-औरंगाबाद महामार्गावर इमामपूर शिवारातील बहिरोबा मळा येथे दुचाकीने धडक दिल्याने निरंजन विजय वाघ ( वय १७ रा. वाघवाडी, जेऊर) हा जागीच ठार झाला आहे.

     याबाबत एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला विजय नानासाहेब वाघ (रा. वाघवाडी, जेऊर) यांनी फिर्याद दिली आहे. मयत निरंजन वाघ हा गावचे ग्रामदैवत नरगीर बाबा यात्रोत्सवानिमित्त कावडीने पायी पाणी आणण्यासाठी प्रवरासंगम येथे गेला होता. येताना इमामपूर जवळ सूर्यकांत ज्ञानदेव आवारे (रा. इमामपूर) याने त्याच्या ताब्यातील दुचाकीने (क्र. एम. एच. १७ सी. जे.३९०६) जोराची धडक दिल्याने निरंजन वाघ मयत झाल्याची फिर्याद दिली आहे.

      अधिक तपास एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मयत निरंजन वाघ हा मनमिळावू तसेच उत्तम क्रिकेटर म्हणून जेऊर पंचक्रोशीत ओळखला जायचा.निरंजन हा इंजिनिअरिंग च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या निधनाने जेऊर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post