माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर येथील रहिवासी दत्तात्रय डोकडे यांचा समाजसेवेबद्दल तसेच कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला आहे.
दत्तात्रय डोकडे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे नगर तालुका अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांनी कोरोनाच्या काळात केलेले कार्य व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या दत्तात्रय डोकडे यांचा मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश, विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय सेल महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने डोकडे यांचा गौरव करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
माननीय शरदचंद्र पवार, सुप्रियाताई सुळे, अजितदादा पवार, जितेंद्र आव्हाड, नामदार प्राजक्त तनपुरे, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. दत्तात्रय डोकडे यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भास्कर मगर, माजी उपसरपंच अरुण ससे, शिवाजी तवले, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटोळे, गोरख तोडमल, प्रेमराज तोडमल, सोमनाथ टिमकरे, सुदाम मगर यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment