मराठ्यांनी एका तरी युवकाला दत्तक घ्यावे ः पुरुषोत्तम खेडेकर




माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर -मराठा सेवा संघ ही सामाजीक चळवळ असून मराठा सेवा संघाने आता युवकांना दत्तक घेऊन शिक्षणाची क्रांती घडवण्याची गरज आहे. युवकांना दत्तक घेतले आणि त्यांना त्याच्या पायवर उभे केले तर निश्चितच उद्याच्या काळात जिजाऊ, शिवराय, सावित्रीमाई या मुलांमधून तयार होतील असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष खेडेकर यांनी नगर येथे कृतज्ञता सनमन सोहळ्यात बोलताना केले.

मराठा सेवा संघ आणि जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि अ.जि.मराठा विद्या प्रसारकचे जी.डी. खानदेशी, राजमाता जिजाऊ चित्रपट निर्मात्या मंदाताई निमसे यांना जीवनगौरव पुरस्कार व मनगाव प्रकल्प देहरे येथील डॉक्टर राजेंद्र धामणे आणि डॉ.सुचिता धामणे यांना कर्म तपस्वी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर, जिल्हा कृषी अधिक्षक शिवाजीराज जगताप, इंजि.विजय घोगरे, मुख्य अभियंता इंजि.प्रकाश मिसाळ, मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, मुख्य अभियंता राजेंद्र राहणे यांचा त्यांच्या कार्याबद्दल खेडेकर, विजय घोगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, आमदार संग्राम जगताप, माजी महापौर, अभिषेक कळमकर, जी.डी.खानदेशी, मंदाताई निमसे, डॉ.राजेंद्र धामणे, डॉ.सुचिता धामणे, इंजि.विजय घोगरे, इंजि.विजयकुमार ठुबे, इंजि.सुरेश इथापे, राजेश परकाळे, मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष सतिष इंगळे, प्रा.पोपटराव काळे, ज्ञानदेव पांडुळे, किशोर मरकड, राजश्री शितोळे, काशिनाथ डोंगरे, निर्मला गिरवले, शोभाताई जाधव, उदय अनभुले, सी.ए.विश्वास कारंजकर, राजेंद्र ढोणे, अशोक वारकड आदीसह मान्यवर उपस्थित होते.


पुढे बोलताना खेडकर म्हणाले की, एक आमदार विचारांचा झाला तर काय होवू शकते हे महाराष्ट्राने पाहिले आहे. विचारांचे नेते तयार झाले पाहिजे आणि यामधूनच क्रांती होणार आहे. तसेच भविष्यात मराठा सेवा संघाचे तथा मराठा पतसंस्थेचे अध्यक्ष विजयकुमार ठुबे यांनी युवकांना रोजगार निर्माण करुन देण्यासाठी अखील भारतीय पातळीवर संस्था उभ्या कराव्यात असे ते म्हणाले.

केंद्रात संभाजी ब्रिगेडची सत्ता आली तर निश्चित पणे भारतरत्न देऊन गौरवण्या येईल आपण त्या पुरस्काराच्या पात्रतेचे आहात असे गौरव उद्गार खेडेकर यांनी डॉ.राजेंद्र धामणे व सुचिता धामणे यांच्या बद्दल काढले. मनोरुग्ण महिलांसाठी कार्य करणार्‍या डॉ.धामणे दांम्पत्यांचे खेडेकर यांनी पुरस्कार देताना कौतुक केले.


राधेश्याम चांडक यांच्याप्रमाणे सुपर काम करुन विजयकुमार ठुबेंनी भरारी घ्यावी ः खेडेकर

बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांच्या प्रमाणे काम करुन मराठा पतसंस्थेचे वाटचाल ठुबे यांनी प्रगतीपथावर नेली आहे, मात्र, भविष्यात त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन नेत्रदिपक काम करुन उंच भरारी घेऊन काम करण्याची गरज आहे. सहकारामधून अनेक चांगल्या गोष्टी करता येतात आणि त्या केल्या की अनेकांना रोजगार उभा करुन देता येतो यासाठी सहकार चळवळ ठुबे यांनी वाढवून सुपर काम करावे अशी भावना व्यक्त केली.                                            

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post