निंबळक येथे जातीय सलोखा दाखवत ईद साजरी


माय अहमदनगर वेब टीम

 नगर तालुका-- नगर तालुक्यातील निंबळक गावात जातीय सलोखा दाखवत सर्व धर्मियांनी एकत्र येत ईद मोठ्या उत्साहात साजरी केली.

     याप्रसंगी बोलताना युवा नेते अजय लामखडे यांनी सांगितले की, निंबळक गावात सर्व सण उत्सव सर्व समाज एकत्रितपणे मोठ्या उत्साहात साजरे करत असतात. निंबळक गावातील जातीय सलोखा हा तालुक्यात आदर्शवत असा आहे. सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची निंबळक ग्रामस्थांची संस्कृती आहे. ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

       या प्रसंगी सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन अविनाश आळंदीकर, ग्रामपंचायत सदस्य आप्पा शिंदे, मौलाना नईम अब्दुल रज्जाक, पटेल नजीर अब्बास, श्रीकांत शिंदे, तौफिक पटेल, रिजवान भाई शेख, अफजल भाई तांबोळी, सलीम शेख, सोनवणे सर, मुनीर शेख, सिकंदर शेख, इलियास शेख, राजू तांबोळी व इतर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_________________________________________

सर्वधर्म समभाव ही निंबळक ची संस्कृती

निंबळक गावामध्ये अठरापगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. येथे कधीही जाती-जातीत तणाव वाद होत नाहीत. सर्व सण उत्सव तसेच एकमेकांच्या सुखदुःखात सर्वजण मोठ्या हिरिरीने सहभागी होतात. सर्वधर्मसमभाव ही आमची संस्कृती आहे.

.......अजय लामखडे (युवा नेते)

______________________________________________

निंबळक गावचा आदर्श इतरांनी घ्यावा

निंबाळ गावामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक मोठ्या आनंदाने राहत आहेत. गावामध्ये कधीही जाती-जातीत तणाव निर्माण होत नाही. सर्वजण एकमेकांच्या सुख दुःखात नेहमीच एका कुटुंबाप्रमाणे सहभागी होतात ही समाधानाची बाब आहे. निंबळक गावचा इतर गावांनी आदर्श घेण्याची गरज आहे. निंबळक गावची ही संस्कृती टिकविण्याचे काम पुढे तरुण पिढीने कायमस्वरूपी करावे.

...... मौलाना नईम अब्दुल रज्जाक

___________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post