माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका-- नगर तालुक्यातील पिंपळगाव तलावातील पंपिंग स्टेशन येथून विद्युत पंप व इतर साहित्याची चोरी झाली आहे. चोरी झालेल्या घटनेबाबत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवप्रहार संघटनेचे युवक तालुकाप्रमुख गोरख आढाव यांनी केली आहे.
पिंपळगाव तलावाचे सुमारे ७०० एकर क्षेत्र महानगरपालिकेच्या नावावर आहे. येथील वनसंपदेचे मोठे नुकसान करण्यात आले होते. नुकसान करणाऱ्यांवर १२६ वृक्षांची तोड केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परंतु पंपिंग स्टेशन येथून विद्युत पंप व इतर अनेक साहित्यांची मोठ्या प्रमाणात चोरी झालेली आहे. त्या घटनेचा पंचनामा देखील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. परंतु या चोरी प्रकरणी गुन्हा का दाखल होत नाही. यामागचे गौडबंगाल काय ? असा सवाल आढाव यांनी उपस्थित केला आहे.
तलावातील पंपीग स्टेशन येथून विविध साहित्याची चोरी झाली असून महानगरपालिकेने सदर प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी गोरख आढाव यांनी केली आहे.
_______________________________
पंपिंग स्टेशन येथील साहित्याची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदर घटनेचा पंचनामा देखील केलेला आहे. परंतु अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याने नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे. तरी साहित्य चोरी प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा.
..... गोरख आढाव (शिवप्रहार संघटना पदाधिकारी)
-------------------------------------
Post a Comment