माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका-- नगर तालुक्यातील जेऊर येथील पिंपळगाव तलावातील रहिवासी सागर गंगाधर माळी ( वय ३३) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते पोलिस खात्यात नोकरीस होते. राहुरी पोलीस स्टेशन येथे त्यांची नियुक्ती होती.
त्यांचे पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे. एकलव्य आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांचे भाचे तर निवृत्त पोलिस अधिकारी गंगाधर माळी यांचा मुलगा होता. सागर माळी यांच्या निधनाने जेऊर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Post a Comment