संत शिरोमणी सेना महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

माय अहमदनगर वेब टीम


 नगर तालुका-- नगर तालुक्यातील जेऊर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी तसेच संत शिरोमणी संत सेना महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

       सोहळा शनिवार दि. ७ मे व रविवार दि. ८ मे दोन दिवस चालणार आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी त्रिवेंद्रानंदसरस्वतीजी महाराज (गणेशानंद गड), श्री १०८ महंत सुनील गिरीजी महाराज (श्रीराम साधना आश्रम), श्री शंकरानंद महाराज (ढोलेश्वर संस्थान), महंत भोलागिरी महाराज (हनुमान घाट), पौराहित्य सतिष खोचे गुरुजी (गंगापूर) यांच्या हस्ते होणार आहे.

     शनिवार दि. ७ रोजी ह.भ.प. श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी त्रिवेंद्रानंदसरस्वतीजी महाराज यांचे कीर्तन तर रविवार दि. ८ रोजी ह.भ.प. धनंजय महाराज ससे (जेऊर) यांचे कीर्तन होणार आहे.

      याप्रसंगी ह.भ.प. प्रकाशशास्त्री महाराज ढेपे, ह.भ.प. रघुनाथ महाराज तोडमल, ह.भ.प. रमेश महाराज चौधरी, ह.भ.प. सुदाम महाराज दारकुंडे, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज केंद्रे, ह.भ.प. कन्हैयालाल शास्त्री, ह.भ.प.बाबामहाराज जाधव, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज आव्हाड उपस्थित राहणार आहेत.

       जेऊर येथे नाभिक समाज व ग्रामस्थांच्या वतीने लोकवर्गणीतून संत सेना महाराजांचे मंदिर उभारण्यात आलेले आहे. रविवार रोजी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सोहळ्याचा जेऊर पंचक्रोशीतील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन येथील सकल नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post