श्रीगोंदा तालुका संघाच्या अध्यक्षपदी नंदू गायकवाड : ऐक्य मंडळाच्या अध्यक्षपदी पांडुरंग झरेकर






 अखिल संघ व ऐक्य मंडळाचे श्रीगोंदा तालुका पदाधिकारी जाहिर

माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची श्रीगोंदा तालुक्याचे पदाधिकारी यांची निवड जाहीर झाली असून कोथूळ या शाळेतील प्राथमिक शिक्षक नंदू गायकवाड यांची श्रीगोंदा संघाच्या तालुकाध्यक्षपदी तर मोखाडी (कोळगाव ) या शाळेतील प्राथमिक शिक्षक पांडुरंग झरेकर यांची ऐक्य मंडळाच्या तालुकाध्यक्षपदी निवड जाहीर झाल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे व संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी  दिली .



 अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व ऐक्य मंडळाची विशेष सभा प्राथमिक शिक्षक बँकेच्या श्रीगोंदा शाखेत पार पडली . श्रीगोंदा तालुक्यातील  संघाच्या सभेत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा झाली .


तालुका पदाधिकारी निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना श्रीगोंदा तालुका संघाचे नूतन तालुकाध्यक्ष नंदू गायकवाड यांनी ही संघटना तालुका ते जागतिक स्तरापर्यंत कार्यरत असून अशी ही  भारतातील एकमेव संघटना आहे .या संघटनेने राज्य स्तरावर अनेक प्रलंबित प्रश्न योग्य ती  मांडणी करून सक्षमपणे सोडविले आहेत . या संघटनेने प्राथमिक शिक्षकांना नेहमी भेडसावणाऱ्या बीएलओ या प्रश्नाबाबत तर थेट नवी दिल्ली येथील भारत निवडणूक आयोगाचे कार्यालयच गाठले असून लवकरच राज्यस्तरीय वस्तुस्थितीदर्शक अहवाल भारत निवडणूक आयोग दिल्ली यांना सादर होणार आहे . ऐक्य मंडळ ही एक विचारधारा असून या विचारधारेशी जिल्ह्यातील अनेक शिक्षक जोडले गेले आहेत .


यावेळी राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी राज्यस्तरावरील मंत्रालयीन पातळीवरील शिक्षक संघाच्या कामाचा आढावा घेतला .यावेळी श्री . निमसे म्हणाले की राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना बीएलओ चे बंधनकारक केलेले काम हे पूर्णपणे वगळणे कामी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाशी सतत संपर्कात असून आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून राज्याच्या विधिमंडळात या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यात आले आहे .


 प्राथमिक शिक्षक बँकेच्या आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने ही मोर्चेबांधणी अतिशय महत्त्वपूर्ण असून श्रीगोंदा तालुक्यातील ऐक्य मंडळाचा हा दमदार प्रवेश हा ऐक्य च्या विजयाची नांदी ठरेल असा विश्वास संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी व्यक्त केला .


 याप्रसंगी राज्य संघटक राजेंद्र निमसे ,संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम , अखिल मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष महादेव चोभे , जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पटेकर, जिल्हा संघटक  मधुकर टकले, संतोष कुंभार, छाया पोटरे आदी उपस्थित होते .



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post