माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील निंबळक येथे श्री हनुमान चालीसा पाठ व श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
स्व. रामनाथ जगन्नाथ गवळी व स्व. गणेशराव रामनाथ गवळी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सतीश गवळी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात शनिवार दि. ३० एप्रिल रोजी झाली असून सांगता शनिवार दि. ७ मे रोजी होणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी काकड आरती, विष्णुसहस्त्रनाम, हनुमान चालीसा पाठ, विठ्ठलनाम जप, सायंकाळी ५ ते ९ श्रीराम कथा ज्ञानयज्ञ व नंतर महाप्रसाद अशी आहे. रामकथा गायक ह.भ. प. सद्गुरू हृदयनिवासी विठ्ठल बाबा देशमुख यांचे शिष्य रामायणाचार्य ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी) हे आहेत.
शनिवार दि. ७ मे रोजी सकाळी ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी निंबळक परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी श्रीराम कथेचे लाभ घेण्याचे आवाहन सतीश गवळी व समस्त गवळी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
_________________________________
सोहळा संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब
श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन गवळी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. निंबळक गाव दिवसेंदिवस धार्मिक क्षेत्राकडे अग्रेसर होत असल्याचे पहावयास मिळत आहे. ही समाधानाची बाब आहे. गवळी परिवाराचा सर्वांनी आदर्श घेण्याची गरज आहे. गवळी परिवाराच्या वतीने आयोजित सोहळ्याचा समस्त नागरिकांनी लाभ घ्यावा.
.....सौ. प्रियंका अजय लामखडे (सरपंच निंबळक)
__________________________________
सतीश गवळी यांचा उपक्रम कौतुकास्पद
आपल्या कुटुंबीयांच्या पुण्यस्मरणानिमित्त सतीश गवळी व समस्त गवळी परिवारातर्फे श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करून समाजापुढे नवीन आदर्श ठेवला आहे. गवळी परिवाराच्या या उपक्रमाचे निंबळक पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
..... ह.भ.प. रामायणाचार्य श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी)
_______________________________
Post a Comment