माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका-- महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनतर्फे आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय रोडसायकलिंग चॅम्पियनशीपमध्ये नगरच्या उदय टिमकरे याने सुवर्णपदक पटकावले.
सबज्युनिअर गटात टाईम ट्रायल या प्रकारात त्याने हे यश मिळवले. स्पर्धेतील ३० किलोमीटरचे अंतर ३२ मिनिटे आणि ११ सेकंदात पूर्ण केले. उदय हा इमामपूरचा असून तो सारडा महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेतो. सोल्जर डिफेन्स अकादमीचे सुमेरसिंह, प्रा. संजय साठे, संकल्प थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करीत आहे. सायकलिंग संघटनेचे प्रताप जाधव तसेच इमामपुर गावचे युवा नेते गणेश आवारे, उध्दव मोकाटे, आदिनाथ तोडमल यांनी उदयचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
Post a Comment