माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका-- केरळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स वेटलिफ्टिंग स्पर्धेत न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज या महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक डॉ शरद बाळासाहेब मगर यांनी ७३ किलो वजन गटात १२५ किलो वजन उचलून सुवर्ण पदक प्राप्त केले.
पावर लिफ्टिंग या खेळात २५० किलो वजन उचलून सिल्व्हर पदकाची कामगिरी केली या स्पर्धा तिरुअनंतपुरम येथे संपन्न झाल्या.
या यशाचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे ,उपाध्यक्ष रामचंद्र दरे,सचिव जी.डी.खान्देशे, सह सचिव अँड विश्वासराव आठरे ,खजिनदार डॉ विवेक भापकर,जेष्ठ विश्वस्त सीताराम खिलारी, दिपलक्ष्मी म्हसे,मुकेश दादा मुळे, जयंत दादा वाघ,संस्थेचे सर्व विश्वस्त, सदस्य,व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी.एच. झावरे,उपप्राचार्य डॉ बाळासाहेब सागडे,(कला शाखा) डॉ अनिल आठरे(विज्ञान शाखा) डॉ संजय कळमकर(वाणिज्य शाखा) प्रबंधक बी. के . साबळे ऑफिस सुप्रीडेंट कदम म्याडम,राजू साबळे,महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख , शिक्षकेत्तर कर्मचारी ,क्रीडा विभागाचे प्रा सुधाकर सुमभे, प्रा धन्यकुमार हराळ,प्रा धनंजय लाटे या सर्वांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment