माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका-- नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलावातील महानुभाव मंदिर येथे स्थान प्रकट दिनानिमित्त शनिवार दि. १४ मे रोजी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी भव्य सर्वज्ञ सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक या चतुर्विध साधनांचा अलभ्य लाभ घडेल तसेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी प्राचीन वस्तुसंग्रहालयाची अतिप्राचीन देवपूजा वंदनासाठी उपलब्ध राहणार आहे. प.पु.प.म. साहित्याचार्य श्रीमामाजी यांचा अपूर्व भेट काळ विधी व मार्गदर्शन पर निरूपण होणार आहे.
यात्रोत्सवादरम्यान स्थानास मंगल स्नान व वस्त्र समर्पण, गीता पाठ रामायण, ध्वजारोहण, सर्वज्ञ सत्संग भेटकाळ व मार्गदर्शन पर निरूपण, विडाअवसर आरती, देवाची भव्य मिरवणूक असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
येथील स्थानाचा उल्लेख लीळाचरित्र ग्रंथात आढळून येत असल्याने येथे मोठ्या संख्येने भक्त भाविक येत असतात. तरी या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन ई. श्री. अतुलमुनी महानुभाव (काकाजी) व श्रीकृष्ण प्रतिष्ठान जेऊर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment