माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका-- नगर तालुक्यातील जेऊर येथील शांतिनिकेतन फाऊंडेशनचे लिटिल वंडर्स स्कूल व विजड्म हायस्कूलने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा सलग आठव्या वर्षी देखील कायम राखली आहे.
श्रीकांत अशोक आढाव याने प्रथम (९०.८० टक्के), द्वितीय मिलिंद बाबासाहेब सातपुते (८९.८० टक्के) तर तृतीय क्रमांक सिद्धी राजेंद्र फडतरे हिने ( ८६.८० टक्के) मिळवला आहे. विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, नवनवीन उपक्रम राबविणे, अभ्यासिका वर भर देणे हे उपक्रम शाळेत राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धा परीक्षा, खेळांच्या स्पर्धा तसेच मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे वैयक्तिक लक्ष देण्यात येत असल्याने शाळेचा निकाल शंभर टक्के लागत आहे. तसेच लिटिल वंडर्स स्कूल हे सलग आठ वर्षे शंभर टक्के निकाल लागणारे पंचक्रोशीतील एकमेव विद्यालय असल्याची माहिती शाळेच्या संचालिका सौ. स्वाती चेमटे यांनी दिली.
शिक्षिका कल्पना वड्डेपल्ली, सारिका पडोळे, मुख्याध्यापक के. व्ही. दुबे यांच्यासह सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती बाजीराव गवारे, सरपंच राजश्री मगर, उपसरपंच श्रीतेश पवार, माजी सरपंच विकास कोथिंबिरे, माजी सरपंच मधुकर मगर यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
__________________________________
Post a Comment