माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका-- नगर तालुक्यातील बहिरवाडी येथे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटी तसेच खंडेलवाल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामपंचायत सरपंच सौ. अंजना येवले व ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकाराने शिबिर संपन्न झाले. शिबिरामध्ये नेत्रतज्ञ डॉ. शिल्पा खंडेलवाल यांनी ग्रामस्थांची नेत्रतपासणी केली. शिबिरासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला.
जागतिक नेत्र दिन तसेच रोटरी क्लब च्या वर्धापन दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सुयोग झंवर यांनी दिली. तसेच रोटरी क्लबच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय बूट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच अंजना येवले, उपसरपंच मधुकर पाटोळे, रोटरी क्लबचे रवि डीक्रूज, सौ चंदना गांधी, शुभश्री पटनाईक, निखिल कुलकर्णी, नचिकेत रसाळ, सायरा इनामदार, भाजप तालुका उपाध्यक्ष राजु दारकुंडे, चेअरमन संजय आढाव, ग्रामपंचायत सदस्य सावळेराम चव्हाण, कांताबाई दारकुंडे, तलाठी सरिता मुंडे, ग्रामसेवक योगेश साबळे, सामाजिक कार्यकर्ते संजय येवले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
__________________________
बहिरवाडी गावात नेहमीच नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असतात. ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून गावामध्ये उपक्रम राबविण्यास प्राधान्य देण्यात येते. त्यासाठी उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत असते ही समाधानाची बाब आहे.
.....सौ. अंजना येवले (सरपंच बहिरवाडी)
_____________________________
बहिरवाडी गावामध्ये ग्रामस्थ, शेतकरी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय तसेच ग्रामस्थ, शासकीय अधिकारी, विविध स्वयंसेवी संस्था यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य मिळत असते. बहिरवाडी गावाची आदर्श गावाकडे वाटचाल सुरू आहे.
....राजु दारकुंडे (भाजप तालुका उपाध्यक्ष)
________________________
Post a Comment