निंबळक ग्रामपंचायतच्या वतीन सौर संचाचे वाटप

माय अहमदनगर वेब टीम 

 नगर तालुका-- नगर तालुक्यातील निंबळक ग्रामपंचायतच्या वतीने सौर संचाचे वाटप करण्यात आले आहे. अनुसूचित वर्गातील प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना १५ टक्के शेष मधून सौर बल्बचे वाटप करण्यात आले आहे.

     वैयक्तिक लाभ योजनेअंतर्गत ३० लाभार्थ्यांना सौर बल्बचे वाटप करण्यात आले आहे. याप्रसंगी बोलताना सरपंच प्रियंका लामखडे यांनी निंबळक गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत कार्यालय सदैव कटिबद्ध आहे. गावातील प्रत्येक नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच गावामध्ये ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महिला यांच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सरपंच प्रियंका लामखडे यांनी दिली.

     याप्रसंगी सरपंच प्रियंका अजय लामखडे, ग्रामविकास अधिकारी सविता लांडे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ खांदवे व इतर ग्रामपंचायत सदस्य, लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

________________________________________________________

 शासनाच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचणार


 शासनाच्या वतीने गोरगरीब जनतेसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात. या योजनांची माहिती व लाभ सर्वांना मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय सदैव प्रयत्नशील राहत आहे. शासनाच्या सर्व योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणार.

......सौ प्रियंका अजय लामखडे (सरपंच, निंबळक)

___________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post