माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका-- नगर तालुक्यातील ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेला पोषण आहार शिजविण्यासाठी भांडी देण्यात आली आहेत.
गावच्या सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांच्या हस्ते विस्ताराधिकारी रामनाथ कराड व हिंगणगाव केंद्रप्रमुख बाळासाहेब दळवी यांच्याकडे भांडी सुपूर्त करण्यात आले आहेत. यापूर्वी ग्रामपंचायतच्या वतीने शाळेला वजन काटा देखील देण्यात आला होता.
यावेळी बोलताना सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी सांगितले की, बालवयातच मुलांवर चांगले संस्कार होत असतात. विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होण्यासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षकवृंद उत्तम प्रकारे सेवा देत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत आहे ही समाधानाची बाब आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच शालेय गुणवत्ता वाढवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे आश्वासन सरपंच प्रियंका लामखडे यांनी दिले.
ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल विस्ताराधिकारी रामनाथ कराड यांनी सरपंच प्रियंका लामखडे व ग्रामपंचायतीच्या सर्व कार्यकारिणीचे आभार मानले. यावेळी ग्रामविकास अधिकारी सौ. सविता लांडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, हिराबाई साठे, लहानीबाई लवांडे, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
_______________________________
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जातात. शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांवर बारकाईने लक्ष देत असतात. शालेय गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही समाधानाची बाब आहे.
...... सौ प्रियंका अजय लामखडे (सरपंच, निंबळक)
__________________________________
Post a Comment