रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे ' विघ्नहर्ता हॉस्पिटल' तज्ञ डॉक्टरांची टीम ; उत्तम सेवा ; जिल्ह्यात नावलौकिक

 माय अहमदनगर वेब टीम 






नगर तालुका (शशिकांत पवार)- नगर जिल्ह्यात रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानणारे रुग्णालय म्हणून नगर येथील 'विघ्नहर्ता' हॉस्पिटलने जिल्ह्यात नावलौकिक मिळविला आहे.

     विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत असून २४ तास सेवा उपलब्ध आहे. येथील कर्मचाऱ्यांकडून देखील प्रत्येक रुग्णास उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. वैद्यकीय क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा निर्माण करून विघ्नहर्ता हॉस्पिटल नावारूपाला आले आहे. व्यवसाय म्हणून न पाहता रुग्णांची सेवा करण्याबाबत विघ्नहर्ता हॉस्पिटलचे नाव आघाडीवर आहे.

     विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये जिल्हाच नव्हे तर पर जिल्ह्यातून देखील रुग्ण उपचारासाठी येत आहेत. यावरून विघ्नहर्ता रुग्णालयाची सेवा व डॉक्टरांची अचूक उपचार करण्याची पद्धत अधोरेखित होते. गोरगरीब रुग्णांवर अत्यंत माफक दरात सेवा करण्यात येत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना विघ्नहर्ता हॉस्पिटल हे आपलेसे वाटत आहे.

     कोरोना काळात सर्वत्र रुग्णालयांनी काय परिस्थिती होती याची जाण सर्वांनाच आहे. त्याही काळात कोरोना रुग्णांची सेवा करण्यात विघ्नहर्ता हॉस्पिटल ची टीम अहोरात्र झटत होती. रुग्णांना तसेच नातलगांना लॉकडाऊन च्या काळात हॉस्पिटल मार्फत जेवणाची व्यवस्था करणारे हे एकमेव हॉस्पिटल होते. कोरोनाच्या काळात या हॉस्पिटलने केलेली रुग्णसेवा सर्वांनीच अनुभवली आहे. पैसा कमविण्यापेक्षा रुग्ण जगविण्यावर भर देणारे हॉस्पिटल म्हणून विघ्नहर्ता हॉस्पिटलचे नाव आवर्जून घेतले जात आहे. ही हॉस्पिटल साठी देखील अभिमानाची बाब आहे.

     विघ्नहर्ता हॉस्पिटलचे उद्घाटनच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यामुळे समाजसेवेचा वारसा जपण्याचे कार्य या हॉस्पिटल कडून करण्यात येत असल्याचे अनेक रुग्ण बोलून दाखवतात. रुग्णाला आजाराची भीती न दाखवता त्याचा आजार व त्यावरील उपचार याबाबत कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे सविस्तर माहिती समजावली जाते. नातेवाईकांना आधार देत काळजी करू नका आम्ही आहोत. हे शब्द कानी पडताच रुग्णाच्या नातलगांना देखील मोठा धीर मिळत असतो.

     जिल्ह्यातील रुग्णांना 'विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल' हे आपलेसे व येथील डॉक्टर हे कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणेच वाटत आहेत. येथील डॉक्टरही रुग्णांशी खूप आपुलकीने वागताना दिसून येतात. विविध गंभीर आजार, अवघडातील अवघड शस्त्रक्रिया येथील डॉक्टरांनी अवलिया पार पाडून हजारो रुग्णांना जीवदान तर अपंगत्व आलेल्यांना आपल्या पायावर उभे केले आहे. रुग्णांची सेवा करण्यामध्ये विघ्नहर्ता हॉस्पिटलचे योगदान महत्वाचे तसेच येथील डॉक्टरांचे कार्य निश्चितच वाखाणण्याजोगे आहे.

       डॉ. महेश वीर, डॉ. अखिल धानोरकर, डॉ. अजय साबळे, डॉ. अमितकुमार कुलांगे, डॉ. नरेंद्र मरकड, डॉ. निलोफर धानोरकर, डॉ. सौ. सुप्रिया वीर या तज्ञ डॉक्टरांबरोबर हॉस्पिटल मध्ये काम करणारे कर्मचारी हे प्रशिक्षित आहेत. सर्वांकडून रुग्ण सेवा करण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्यात येत असल्याने हॉस्पिटलचे नाव जिल्ह्यात प्रसिद्ध झाले आहे.

      विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती बहिरवाडी माजी सरपंच विलास काळे, पांढरीपुल सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ काळे, डोंगरगण उपसरपंच कैलास पटारे, जेऊर उपसरपंच श्रीतेश पवार, बंडू पवार, बहिरवाडी सरपंच संजय येवले, झापवाडी माजी सरपंच शशिकांत वाघ यांनी दिली.

___________________________________________________________________

रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा

विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये आलेल्या प्रत्येक रुग्णाची सेवा करणे यातच ईश्वरसेवा आहे. येथे येणाऱ्या सर्व रुग्णांना जास्तीत जास्त उत्तम सेवा देण्याचा हॉस्पिटल प्रशासनाचा प्रयत्न असतो. आलेल्या रुग्णांवर अचूक निदान करुन लवकरात लवकर बरे करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातात. रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्याकडुन तसेच त्याच्या नातेवाईकांनी दिलेले आशिर्वाद आम्हाला सर्वात मोठे समाधान देऊन जातात.

...... डॉ. महेश वीर ( विघ्नहर्ता हॉस्पिटल, अहमदनगर)

________________________________________________

हॉस्पिटल मधील उपलब्ध सुविधा

विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये * सिटीस्कॅन *सोनोग्राफी * सुसज्ज ऑपरेशन थिएटर *सुसज्ज आय.सी.यु. *आंतरराष्ट्रीय दर्जाचे आय.व्ही. एफ. लॅब/ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर  * संपूर्ण वातानुकूलित हॉस्पिटल अशा अत्याधुनिक सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.

________________________________________________ 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post