बायजामाता दिंडीचे भक्तीमय वातावरणात पंढरपुरकडे प्रस्थान

 माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका--नगर तालुक्यातील जेऊर येथील श्री देवी बायजामाता दिंडीचे शुक्रवार दि. १ जुलै रोजी मोठ्या जल्लोषात तसेच भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

     श्री क्षेत्र जेऊर ते श्री क्षेत्र पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्याचे हे तेरावे वर्ष आहे. शुक्रवार दि. १ जुलै ते सोमवार दि. ११ जुलै दरम्यान पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वै. ह.भ.प. गुरुवर्य बाळकृष्ण महाराज भोंदे तसेच ह.भ.प. प्रकाश शास्त्री महाराज ढेपे,  ह.भ.प. मच्छिंद्र महाराज तवले आशीर्वादाने ह.भ.प. रघुनाथ महाराज तोडमल, ह.भ.प. भीमराज महाराज कुलट, ह.भ.प. धनंजय महाराज ससे, ह.भ.प. रमेश महाराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे.

      पालखीचे रथ पूजन अक्षय कर्डिले यांच्या हस्ते तर बैलजोडी पूजा सुनील पवार, सतीश थोरवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगर, भानुदास हसणाळे यांच्या हस्ते करण्यात आली. दिंडीमध्ये जेऊर, इमामपूर, चापेवाडी, तोडमलवाडी, वाघवाडी, बहिरवाडी, ससेवाडी, धनगरवाडी, आढाववाडी, बुऱ्हाणनगर, तवले नगर, वाकी वस्ती, टाकळी खादगाव, सारोळा बध्दी, कात्रड या गावातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दिंडीतील वारकऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी व औषधोपचार डॉक्टर सचिन कोरडे हे मोफत करणार आहेत.

      दोन वर्ष कोरोनामुळे खंडित झालेल्या दिंडी सोहळ्यासाठी जेऊर पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. चौका चौकात दिंडीचे स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी आणि हरिनामाच्या गजरात दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. यावेळी संपूर्ण जेऊर गाव भक्तिमय झाले होते.

    दिंडी सोहळ्याच्या यशस्वीततेसाठी अध्यक्ष शरदनाना तवले, भाऊसाहेब साबळे, नारायणदादा तोडमल,ह.भ.प रघुनाथ महाराज तोडमल, सुनील पवार, गणपत वने, पानसरे सर, भास्करराव मगर यांच्यासह समस्त जेऊर ग्रामस्थ प्रयत्नशील राहणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post