माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर जिल्हा
परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने जेऊर गटातून इच्छुक उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. जेऊर गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी अनेक जणांनी गेल्या सहा महिन्यापासून गट पिंजून काढला होता. परंतु गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने इच्छुक उमेदवारांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. आता जेऊर गटातून गणेश आवारे युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश आवारे यांच्या पत्नी सौ. रोहिणी आवारे यांना संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा गटामध्ये सुरू आहे.
गणेश आवारे जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी स्वतः इच्छुक होते. त्यांनी गटामध्ये तशी तयारी केली होती. परंतु गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने गणेश आवारे यांच्या पत्नी सौ. रोहिणी आवारे यांचे नाव जेऊर जिल्हा परिषदेच्या गटातून आघाडीवर आले आहे. गणेश आवारे युवा प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम तसेच वैयक्तिक गणेश आवारे यांचे धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमातील योगदान याचा निश्चित फायदा सौ. रोहिणी आवारे यांना होणार आहे.
गणेश आवारे यांचा जेऊर गटातील दांडगा जनसंपर्क तसेच गट पुनर्रचनेत सोयीस्कर झालेला गट हे रोहिणी आवारे यांच्या पथ्यावर पडणार आहे. गणेश आवारे हे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आहेत. गणेश आवारे यांच्या पाठीशी तरुणांची मोठी फळी तर वृद्धांचे मार्गदर्शन, महिलांचा आदर करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गणेश आवारे यांचा गटातील प्रत्येक गावात मोठा मित्रपरिवार तसेच नातेसंबंध आहेत. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मदतीमुळे ते प्रत्येक गावात गावातील प्रत्येक कुटुंबात पोहोचलेले आहेत.
गणेश आवारे युवा प्रतिष्ठान नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवून चर्चेत राहिलेले आहे. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक ठिकाणी धार्मिक, शैक्षणिक क्षेत्राला केलेली मदत तसेच तरुणांची मोठी फळी उभी करण्यात आवारे यांना यश आले आहे. इमामपूर येथील झालेल्या सेवा संस्थेच्या अटीतटीच्या लढतीत गणेश आवारे यांच्या पॅनलने सत्ता मिळवली होती. त्यामुळे त्यांच्यावर जनतेचा असलेला दृढ विश्वास दिसून येत आहे. गोरगरीब जनतेची सेवा निस्वार्थीपणे करण्यात गणेश आवारे नेहमीच पुढाकार घेत असतात. गणेश आवारे इमामपूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक आहेत. त्यांची सत्ता आली असताना देखील त्यांनी स्वतः चेअरमन न होता दुसऱ्याला संधी दिली. यातून त्यांच्या अंगी असलेल्या मोठेपणाची जाणीव होते. तसेच त्यांच्याकडे कोणतेही पद नसताना आजही गटातील गोरगरीब जनता त्यांच्याकडे कामे घेऊन येतात व प्रश्नांचा निपटारा करण्याचे कसब त्यांनी आत्मसात केल्याने नागरिकांच्या समस्या माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून ते नेहमीच सोडवत आलेले आहेत.
गणेश आवारे यांची गटातील पक्ष विरहित मित्रपरिवार वैयक्तिक संबंध यामुळे त्यांना निवडणुकीत निश्चित फायदा होणार असल्याचे मानले जात आहे. गट आरक्षित झाल्याने सौ. रोहिणी आवारे यांना उमेदवारी निश्चित मिळणार असल्याचीही चर्चा जेऊर गटामध्ये सुरू झाली आहे. गणेश आवारे यांच्याकडे सर्वसामान्यांचे नेतृत्व करण्याची क्षमता, गटातील समस्यांचा गाढा अभ्यास व त्या समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता असल्याने सौ. रोहिणी आवारे यांची जिल्हा परिषदेत वर्णी लागणार का ? याबाबत जेऊर गटातील नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गणेश आवारे यांनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या कार्यामुळे त्यांचे नाव तालुक्यात चर्चिले जात आहे. गणेश आवारे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी यासाठी गटातील अनेक कार्यकर्त्यांनी मागणी देखील केली होती. आता स्वतः गणेश आवारे यांनीच आपल्या पत्नी रोहिणी आवारे जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट केल्याने गणेश आवारे यांच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे. तरुण कार्यकर्त्यांची फौज प्रचारासाठी सक्रिय असून जेऊर जिल्हा परिषद गटाची निवडणूक ही गणेश आवारे यांच्यासाठी तरुणच हातात घेतील, असे चित्र दिसून येत आहे.
रोहिणी आवारे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केल्याने तसेच गणेश आवारे यांचा असलेला जनसंपर्क व सामाजिक क्षेत्रातील योगदान पाहून त्यांना मिळत असलेला मतदारसंघातील पाठिंबा यामुळे विरोधकांकडुन देखील तगडा उमेदवार देण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे.
_______________________________________
रोहिणी आवारे यांना निवडणूक सोयीची
सौ. रोहिणी आवारे यांच्यासाठी जेऊर गट सोयीचा झाला आहे. तसेच पती गणेश आवारे यांचे सामाजिक कार्य व गणेश आवारे युवा प्रतिष्ठानच्या कार्यामुळे त्यांचे नाव गटातील प्रत्येक गावात पोहोचलेलेच आहे. गणेश आवारे यांचा असलेला दांडगा जनसंपर्क व तरुणांची मिळत असलेली साथ या बळावर रोहिणी आवारे यांना जिल्हा परिषदेचे निवडणूक सोपी जाणार असल्याचा कयास गटातील जनतेमधुन व्यक्त केला जात आहे.
_____________________________________________
Post a Comment