माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर येथील शांतिनिकेतनच्या लिटिल वंडर्स स्कूल अँड विजडम हायस्कूल मध्ये मोठ्या उत्साहात रक्षाबंधन सोहळा संपन्न झाला.
रक्षाबंधन सोहळ्याअंतर्गत टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनविण्याच्या उपक्रमातून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवल्या होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने सुंदर व आकर्षक अशा राख्या बनवल्या होत्या. मुलींनी मुलांना परंपरेनुसार औक्षण करून राख्या बांधल्या तर मुलांनी ही मुलींना विविध आकर्षक भेटवस्तू देत बहीण भावांच्या नात्याला उजाळा दिला.
शाळेच्या संचालिका सौ. स्वाती चेमटे, प्राचार्य के. व्ही. दुबे, कल्पना वड्डेपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. मेघा वरखेडकर, सौ. सारिका धुमाळ, सौ. राणी जरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसेच शिक्षणाबरोबरच भावी जीवनात उद्योगधंदे, व्यवसाय उभारण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यालयात नेहमीच असे नवनवीन उपक्रम राबविले जात असल्याची माहिती सौ. स्वाती चेमटे यांनी दिली.
Post a Comment