ससेवाडीच्या सरपंच पदी चांगदेव ससे यांची निवड

 माय अहमदनगर वेब टीम 


 नगर तालुका- नगर तालुक्यातील ससेवाडी गावच्या सरपंच पदी चांगदेव बाबासाहेब ससे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

    ससेवाडीचे सरपंच दत्तात्रय जरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती. निवडणूक अधिकारी म्हणून मंडळाधिकारी वृषाली करोसिया, ग्रामसेवक पालवे यांच्या उपस्थितीत सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली.

     सरपंच पदासाठी चांगदेव ससे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ससेवाडी ग्रामपंचायत मध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले गटाची सत्ता आहे. निवडीनंतर सरपंच चांगदेव ससे यांनी गाव विकासासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे ससे यांनी सांगितले.

     चांगदेव ससे यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माजी उपसरपंच शंकर बळे, लक्ष्मण ससे, संजय ससे, जालिंदर आठरे, नानाभाऊ ससे, आदिनाथ आठरे, भाऊराव आठरे, कुशाबा शिर्के, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

__________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post